बनावट सहीप्रकरणी शेखर गोरेंवर गुन्हा

By admin | Published: October 30, 2014 12:41 AM2014-10-30T00:41:21+5:302014-10-30T00:41:21+5:30

संयुक्त खात्यातून ५.७0 कोटी काढले

Shekhar Goreen's offense | बनावट सहीप्रकरणी शेखर गोरेंवर गुन्हा

बनावट सहीप्रकरणी शेखर गोरेंवर गुन्हा

Next

सातारा : धनादेशावर खोटी सही करून संयुक्त खात्यातील ५.७0 कोटी रुपये परस्पर काढल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह राजकुमार भोसले, आयसीआयसीआयचे कर्मचारी मंगेश राऊत, अजय जैन
यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेखर गोरे हे विधानसभेसाठी माण मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे होते.
याप्रकरणी शेखर गोरे यांचे भाऊ अंकुश गोरे यांचे स्वीय सहायक महेश बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार अंकुश आणि शेखर गोरे यांची ‘कमल एंटरप्रायजेस’ कंपनी असून तिचे ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या दहिवडी शाखेत संयुक्त खाते आहे. या खात्यातील पाच कोटी ७0 लाखांची रक्कम शेखर यांनी कंपनीतील कर्मचारी राजकुमार भोसले यांच्या सहकार्याने अंकुश यांची बनावट सही करून परस्पर काढले आहेत.
हा ‘अ‍ॅट पार’ धनादेश ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या पुणे येथील फडके हौद शाखेतील कर्मचारी अजय जैन या कर्मचाऱ्याच्या मदतीने वठवून घेतला आणि ही रक्कम स्वत:च्या ‘आदित्य कन्स्ट्रक्शन’च्या नावे जमा करून घेतली.
ही रक्कम ‘आदित्य कन्स्ट्रक्शन’चे खाते असलेल्या ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या कोथरूड शाखेत जमा झाल्यानंतर शेखर यांनी त्यातील दीड कोटी मेहुणा विशाल क्षीरसागर (रा. लोणंद) तर आणखी दीड कोटी स्वरूपखानवाडीचे सरपंच गणेश सत्रे यांच्या खात्यावर असे एकूण तीन कोटी रुपये वर्ग केले. महेश बोराटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी ही तक्रार शेखर गोरे यांचे भाऊ अंकुश गोरे यांच्या सांगण्यानुसारच दाखल केली. मी मंगळवारी (दि. २८) आ. जयकुमार गोरे यांच्या दहिवडी येथील कार्यालयात असताना मला अंकुश गोरे यांचा फोन आला आणि मी मुंबईत असल्यामुळे मला येता येत नाही. मी मेलवरून या प्रकाराबाबत तक्रार देण्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सहीचे पत्र पाठवून देत आहे. त्या अधिकार पत्रानुसार फिर्याद दाखल करण्यास सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाच्या अनुंषगाने आवश्यक असणारी कारवाई आता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनच वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती दहिवडी पोलीसांनी दिली. (प्रतिनिधी)
मते मिळविण्यासाठी वापर
अंकुश आणि शेखर यांच्या ‘कमल एंटरप्रायजेस’मध्ये पैशांच्या कारणावरून वाद असल्याची कल्पना दहिवडी शाखेतील व्यवस्थापक मंगेश राऊत यांना तोंडी दिली होती. तरीही त्यांनी कोणतीही शहानिशा न करता हा धनादेश वठविण्यास मदत केल्याचे महेश बोराटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शेखर गोरे यांनी हा पैसा निवडणुकीमध्ये मते मिळविण्यासाठी वापरला असल्याची माहिती मिळाल्याचेही बोराटे यांनी म्हटले आहे.

Web Title: Shekhar Goreen's offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.