शेनवडीत सत्ताधारी गटाचेच वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:59+5:302021-01-20T04:37:59+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या शेनवडी ग्रामपंचायतीत सत्ताधारी श्रीनाथ मस्कोबा धुळोबा दऱ्याबा ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या शेनवडी ग्रामपंचायतीत सत्ताधारी श्रीनाथ मस्कोबा धुळोबा दऱ्याबा ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.
सुरुवातीला बिनविरोध निवडणूक करायची या विचाराने गावपातळीवर दोनवेळा बैठक झाली. मात्र, अखेरच्या क्षणी अपक्ष उमेद्वार रिंगणात उतरल्याने मतदान प्रक्रिया चुरशीत पार पडली. निवडणुकीत सत्ताधारी गटाने ६-३ च्या फरकाने वर्चस्व निर्माण केले. एकूण नऊ जागांपैकी प्रभाग २ मधून नंदाबाई खिलारी यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग १ मधून सूरज कदम ३५३, सिंधू कदम २२४, जयश्री कदम ३५२, प्रभाग ३ मधून माजी सरपंच संजय खिलारी २४६, हरिश्चंद्र खिलारी २३०, अपक्ष लिना कदम ३००, मनीषा खिलारी २४६, सचिन वाघमारे यांना २१० मते मिळाली.
श्रीनाथ मस्कोबा पॅनेलसाठी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, सरपंच मोहनशेट कदम, माजी सरपंच संजय खिलारी, हरिष कदम, सुरेश कदम, शिवाजी कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन सत्ता अबाधित ठेवली.