शेरेचीवाडी ग्रामविकासाचे रोल मॉडेल ठरेल : अविनाश फडतरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:54+5:302021-07-08T04:25:54+5:30
फलटण : शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासासाठी ठेवलेले व्हिजन व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व ...
फलटण : शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासासाठी ठेवलेले व्हिजन व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग अशा सर्व मार्गांनी होत असलेल्या प्रयत्न व सहकार्यामुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे रोल मॉडेल ठरेल व त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत ही पूर्णतः सहकार्य केले जाईल,’ असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.
शेरेचीवाडी (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी नलवडे, ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले तसेच गावकामगार तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासो ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासो रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.