श्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:31 PM2020-11-18T20:31:06+5:302020-11-18T20:33:01+5:30

ग्रॅच्युइटीची रक्कम, थकित पगार किंवा रजेचा पगार असेल तो द्यावा. आमचे कारखाना प्रशासन व नेतेमंडळींशी वैर नाही. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु कारखाना प्रशासन व नेतृत्वाची घमेंड असेल तर आमचीही माघार नाही. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

Shimga agitation of retired workers against Shriram | श्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन

श्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन होळी पेटविली : नेतृत्वाची घमेंड असेल तर माघार नाही

फलटण : ग्रॅच्युइटीची रक्कम, थकित पगार किंवा रजेचा पगार असेल तो द्यावा. आमचे श्रीराम सहकारी साखर कारखाना प्रशासन व नेतेमंडळींशी वैर नाही. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु कारखाना प्रशासन व नेतृत्वाची घमेंड असेल तर आमचीही माघार नाही. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

दरम्यान, यावेळी श्रीराम विरोधात होळी पेटवून शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकित पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा, यासाठी दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनांच्या नावाने शंखध्वनी करून शिमगा आंदोलन केले. यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम बोलत होते.

दिवाळीचा पाडवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. परंतु पाडव्याला निवृत्त कामगारांना शिमगा आंदोलन करावे लागले आहे. गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण सुरू आहे. परंतु कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे. आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पाडव्यादिवशी शिमगा आंदोलन करत आहे. कारखाना प्रशासन व नेतृत्वाचा आम्ही निषेध करत आहोत, असेही अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले.

२०१७ पासून आमच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. रामनगरीत दिवाळीचा सण साजरा होतोय. परंतु आज येथे आम्हाला होळीचा सण साजरा करायला लागत आहे. यासारखे दुर्दैव नाही. प्रशासनाला, आमची एकच विनंती आहे, आमची चर्चेची तयारी आहे. कोणताही प्रश्न चर्चेतून सोडवता येतो, प्रशासनाने आमचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी यावेळी रवींद्र फडतरे यांनी केली.

Web Title: Shimga agitation of retired workers against Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.