शिंदेवाडीचा दिल्लीत होणार गौरव : -स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:18 PM2019-06-19T23:18:29+5:302019-06-19T23:18:46+5:30
‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत
पाचगणी : ‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत अद्वितीय काम केलेल्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या गावकारभाऱ्यांना निमंत्रित केले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान संपूर्ण देशात झालेल्या स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम २४ जून रोजी दिल्ली येथे होत आहे. दिल्ली येथे होणाºया या सुंदर व स्वच्छ शौचालय बक्षीसवितरण कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पेयजल व स्वच्छता विभागाचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्याबरोबर जिल्ह्यातील शिंदेवाडी (ता. जावळी) सरपंच धनश्री शिंदे, धनगरवाडी (ता. खंडाळा) सरपंच चंद्रकांत पाचे, बनवडी (ता. कºहाड) स्वच्छतादूत शंकर खापे, स्वच्छतादूत, मठाचीवाडी (ता. फलटण) स्वच्छतादूत संदीप एखंडे, मान्याचीवाडी (ता. पाटण) आदर्श सरपंच रवींद्र माने या प्रतिनिधींना दिल्ली येथे दि. २४ जून रोजी होणाºया कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे.
तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत...
शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या धनश्री शिंदे यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतले असून, जलव्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता याबरोबरच तालुक्यात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मानही या गावाने मिळविलेला आहे.
शिंदेवाडी, ता. जावळी येथील केंद्र सरकारच्या स्वच्छ व सुंदर स्पर्धेतील सहभागी असणाऱ्या शौचालयाची उत्कृष्ट रंगरंगोटी करण्यात आली आहे.