संघाच्या शस्त्र पूजनात नव्या समीकरणाचा ‘उदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:58 PM2017-09-28T22:58:04+5:302017-09-28T22:58:04+5:30

 'Shining' of the new Arithmetic of Armed Forces | संघाच्या शस्त्र पूजनात नव्या समीकरणाचा ‘उदय’

संघाच्या शस्त्र पूजनात नव्या समीकरणाचा ‘उदय’

Next


प्रमोद सुकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : गत ५० वर्षे काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे वारसदार चक्क कºहाडातील आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नजीकच्या काळात उदयदादा पक्षीय ‘सीमोल्लंघन’ करणार का, याबाबतची उलटसुलट चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम त्यांचे पुत्र माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांनी आजपर्यंत केले. म्हणून तर एकदा दोनदा नव्हे तर कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांनी विजयाची ‘सप्तपदी’ पूर्ण केली; पण गत विधानसभा निवडणुकीवेळी काँगे्रसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कºहाड दक्षिणेतून काँगे्रसच्या चिन्हावर उभे राहिले. आणि उंडाळकरांनी बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला; पण उंडाळकरांच्या विजयाचा काटा पुढे सरकला नाही. तो सातवरच थांबला.
गेली ५० वर्षे जातीवादी अन् धर्मांध शक्तींवर टीका करण्याची एकही संधी विलासराव पाटील-उंडाळकरांनी सोडली नाही. तरुणांनी राष्ट्रीय प्रवाहात राहिले पाहिजे, असा विचार त्यांनी नेहमीच मांडला. गत विधानसभा निवडणुकीवेळी काँगे्रसने उमेदवारी नाकारल्यानंतर दक्षिणेतून भाजपने त्यांना उमेदवारी देऊ केल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. राष्ट्रवादी काँगे्रसनेही त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता म्हणे; पण त्यावेळी त्यांनी ‘उमेदवारी नको पाठिंबा द्या,’ असा पवित्रा घेतला. आणि राजेंद्र यादव यांना जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करीत राष्ट्रवादीने उंडाळकरांना पाठिंबा दिला. मात्र, राष्ट्रवादीचे दक्षिणेतील शिलेदार उंडाळकरांच्या प्रचारात कुठे दिसलेच नाहीत.
दक्षिणेतील उंडाळकरांच्या पराभवानंतर त्यांचा हा गट काय करणार, याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले होते. उंडाळकरांचे वारसदार अ‍ॅड. उदय पाटील यांनी भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंशी मैत्रिपर्व प्रस्थापित करीत बाजार समिती व कृष्णा कारखान्याची निवडणूक एकत्रित लढत सत्तांतर केले; पण
पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी हे मैत्रिपर्व संपले. उंडाळे-येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विजयाची दमदार वाटचाल सुरू केलेले ‘दादा’ आता भविष्यात राजकीय वाट कशी चोखाळणार? याची उत्सुकता साºयांनाच आहे.
आरएसएस शाखेच्या वतीने सर्वत्र संघाचा विजयोत्सव म्हणून शस्त्र पूजनाचा कार्यक्रम केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून कºहाड शाखेच्या वतीनेही नुकताच शस्त्र पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र किरकोळे उपस्थित होते. जिल्ह्याचे सहकार्यवाहक श्रीकांत एकांडे हेही यावेळी उपस्थित होते. तर उदय पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावल्याने त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
पुतण्याचे सीमोल्लंघन वर्षभरापूर्वीच !
विलासराव पाटील यांचे ज्येष्ठ बंधू जयसिंगराव पाटील यांची राजकीय वाटचालीत काकांना नेहमीच मदत झाली. या दोन भावांमध्ये नेहमीच सलोखा, प्रेम राहिले. पण ते प्रेम पुढच्या पिढीला टिकवता आले नाही. विलासकाकांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आनंदराव पाटील यांनी वर्षभरापूर्वीच काकांना सोडचिठ्ठी देत सीमोल्लंघन करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात ऐवढेच.
सेनेच्या ‘शंभूराज’ नाही मदत !
विलासराव पाटील-उंडाळकर हे ऐकेकाळी जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखले जात होते. कºहाड दक्षिणेतच नव्हे तर प्रत्येक मतदार संघात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. नजीकच्या पाटण विधानसभा मतदार संघातही कोणाला आमदार करायचे? यात त्यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावलीय. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसार्इंनी सेनेचा धनुष्यबाण हातात घेतल्यावर जवळचे नातेवाईक असणाºया देसार्इंना म्हणजेच शिवसेनेच्या देसार्इंना त्यांनी ‘म्हटली तर छुपी म्हटलं तर उघड’ मदत केली आहे.

Web Title:  'Shining' of the new Arithmetic of Armed Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.