शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

By Admin | Published: March 13, 2017 05:12 PM2017-03-13T17:12:38+5:302017-03-13T17:12:38+5:30

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

Shipupuriya fifty places leakage! | शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

googlenewsNext

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

शाहूपुरी (सातारा) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळांच्या चटक्यांची दाहकता जाणवत असतानाच शाहूपुरीमध्ये लाखो लिटर पाणी गटारीतून वाहून जात आहे. येथील दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, समता पार्क, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी परिसरातील जलवाहिनीला सुमारे पन्नास ठिकाणी गळती लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यात सणासुदीच्या काळात अनेक गावांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्याच्या उपनगरांमध्येही काही दिवसांतच ही वेळ येणार आहे. या अवस्थेतही शाहूपुरीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. शाहूपुरीला पाणीपुरवठा करत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून दररोज लाखो लिटरचे पाणी वाया जात आहे.
गळती लागल्यामुळे या परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साठत आहे. तेथून जाताना ज्येष्ठ नागरिक, तरुणींचे पाय घसरत असल्याने तेथून चालणेही अवघड बनत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच अवस्था असताना त्याकडे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष लागून येथील सर्व गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणाला कधी कळणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
दुरुस्तीचे कर्मचारी अवेळी
जीवन प्राधिकरणने या परिसरात जलवाहिनीच्या दुुरुस्तीसाठी कर्मचारी नेमले आहेत. परंतु ते कधीही वेळेवर उपलब्ध नसतात. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते करून तेथून पळ काढतात. त्यामुळे परत त्या जागेवर गळती लागते. गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्यच ठरते.
प्राधिकरणने मनमानी कारभारास वेळीच आवर न घातल्यास ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शाहूपुरीत अनेक वर्षे पाणीपुरवठा गळतीचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन नसल्याने येथील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
- भारत भोसले
 

Web Title: Shipupuriya fifty places leakage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.