जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:15 AM2021-02-21T05:15:01+5:302021-02-21T05:15:01+5:30

...... कर्ज वसुलीला सहा महिने मुदतवाढ द्यावी सातारा : कोरोनामुळे आठ महिने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यामुळे कोणत्याही ...

Shiv Jayanti celebration at the Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

Next

......

कर्ज वसुलीला सहा महिने मुदतवाढ द्यावी

सातारा : कोरोनामुळे आठ महिने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यामुळे कोणत्याही कर्जदाराला या काळात कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. आता हप्ते न भरल्याने कर्जदारांना जप्तीची नोटीस पाठविली जात आहे. ही कर्ज वसुली सहा महिने थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या सातारा शहर शाखेच्या वतीने सहकार विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव इंगवले, सुनील भोसले, सुमीत नाईक, विनायक शिंदे उपस्थित होते.

...........

सातव्या वेतन आयोगाचे पैसे देणार

सातारा : सातारा नगरपालिकेतील पेन्शनधारकांना ७ व्या वेतन आयोगातील फरक १५ फेब्रुवारी रोजी देण्यात आला जे कर्मचारी सध्या कामावर आहेत, अशा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील पहिला हप्ता एप्रिल महिन्यात देण्यात येईल, असे स्पष्टीकरण सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली. सातारा म्युनिसिपल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.

Web Title: Shiv Jayanti celebration at the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.