वाईत उद्या साजरा होणार शिवप्रताप दिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:57 PM2021-12-09T13:57:26+5:302021-12-09T14:12:25+5:30
शिवप्रताप उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३६२ वा 'शिवप्रताप दिन' गणपती घाटावर साजरा करण्यात येत आहे.
वाई : शिवप्रताप उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३६२ वा 'शिवप्रताप दिन' शुक्रवारी (ता.१०) येथील गणपती घाटावर सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येत आहे.
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शिवशके ३४८ या दिवशी छ. शिवाजी महाराजांनी देवद्वेष्ट्या व धर्मद्वेष्ट्या अफजलखानाचा वध केला, तो दिवस म्हणजे शिवप्रतापदिन तसेच वाई नगरीचा अफजलखानाचे विळख्यातून मुक्तीदिन होय.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई उपस्थित राहणार आहेत. यावेळी यशवंत जाधव (संभाजीनगर) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम तसेच किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन, समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी केले आहे.