पाटणला ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:36 AM2021-02-12T04:36:48+5:302021-02-12T04:36:48+5:30
पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये तालुक्यातील १०७, तर सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये १२ ग्रामपंचायतींचा ...
पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये तालुक्यातील १०७, तर सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये १२ ग्रामपंचायतींचा समावेश होता. निवडणुका पार पडलेल्या ११९ ग्रामपंचायतींपैकी एकूण ७५ ग्रामपंचायतींवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगलीच बाजी मारत एकहाती सत्ता मिळविली आहे. १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया सलग तीन दिवस सुरू होती. या प्रक्रियेमध्ये १०७ ग्रामपंचायतींपैकी ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेना पक्षाच्या सरपंच, उपसरपंचांची निवड झाली आहे.
सत्ता मिळविलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बोंद्री, दिवशी खुर्द, घाणबी, वाटोळे, कातवडी, खिवशी, पिपंळोशी, दुसाळे, मालोशी, बांबवडे, आंबळे, मणदुरे, बोडकेवाडी, मंद्रुळहवेली, ठोमसे, आडदेव, त्रिपुडी, नाडोली, कोदळ पुनर्वसन, चोपडी, मूळगाव, कवरवाडी, आंब्रुळे, हावळेवाडी, जरेवाडी, सांगवड, कोरीवळे, शिंदेवाडी, सोनवडे, चोपदारवाडी, वाडीकोतावडे, गोकुळ तर्फ पाटण, आटोली, पाचगणी, आंबेघर तर्फ मरळी, धावडे, पेठशिवापूर, कोकीसरे, तामिणे, सळवे, बाचोली, कोळेकरवाडी, सातर, जानुगडेवाडी, उमरकांचन, धामणी, वाझोली, मस्करवाडी, चव्हाणवाडी, धामणी, मोरेवाडी कुठरे, पाचपुतेवाडी, कसणी, निगडे, पवारवाडी, काळगाव, सुपुगडेवाडी, शिद्रुकवाडी, मानेवाडी, काढणे, गुढे, खळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
- चौकट
सुपने-तांबवे गणातही वर्चस्व
कऱ्हाड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीसंदर्भात स्थगिती असल्याने सुपने-तांबवे गणातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडी अद्याप झाल्या नाहीत. यामध्ये १२ पैकी ७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने गृहराज्यमंत्री देसाईंच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळविली आहे. तांबवे, म्होर्पे, वस्ती साकुर्डी, गमेवाडी, आबईचीवाडी, पाडळी-केसे व बेलदरे या ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे.
फोटो : ११केआरडी०३
कॅप्शन : पाटण तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.