शिवसेनेच्या आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या विचारांना तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:25+5:302021-09-14T04:46:25+5:30

कोरेगाव : ‘कोरेगावचे विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत, त्यांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर भाजपचे कार्यकर्ते दिसतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांना ...

Shiv Sena MLAs crack down on CM's views | शिवसेनेच्या आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या विचारांना तडा

शिवसेनेच्या आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या विचारांना तडा

Next

कोरेगाव : ‘कोरेगावचे विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत, त्यांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर भाजपचे कार्यकर्ते दिसतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांना तडा देण्याचा काम करतात, की भारतीय जनता पक्ष चालवितात हेच आम्हाला समजून येत नाही. त्यांनी शिवसेनेचे आमदार म्हणून वागले पाहिजे आणि महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महाविकास आघाडीतील घटकांना बरोबर घेऊन त्यांनी चालले पाहिजे,’ अशी टीका कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पिंपोडे खुर्द येथे एका कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्त्युतर देण्यात आले. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत डिपॉझिट जप्त करण्याचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

जरंडेश्वर कारखान्यावर बोलण्याचा आमदार महेश शिंदे यांना नैतिक अधिकार नाही, कारखाना उभारणीत त्यांचे एक टक्काही योगदान नाही. त्यांनी एक टनदेखील ऊस घातला नाही, असे स्पष्ट करून जगदाळे म्हणाले की, ‘आम्ही कारखान्याचे संस्थापक-सभासद आहोत, आज कारखाना व्यवस्थित चालू आहे, लाखो टन उसाचे गाळप केले जात आहे, ज्यांनी कारखाना उभारला, त्यांना व्यवस्थित चालविता आला नाही, हा त्यांचा दोष आहे, त्यामुळे इतरांना दोष देणे योग्य नाही. मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने कोरोनाकाळात काम करणे, हे त्यांचे कर्तव्यच होते, त्याची जाहिरातबाजी करणे चुकीचे आहे. गुंडांचा वापर कोण करतोय, हे मतदारसंघातील सामान्य जनतेला माहीत आहे. कुमठे येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीला कोविड हॉस्पिटलमध्ये गुंडांनी दिलेली वागणूक सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. कोरोना काळात गरिबांना लुटण्याचे काम करत, रुग्णांकडूनच व्यवसाय केल्याचा आरोप जगदाळे यांनी केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय झंवर यांनी आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कारखान्याच्या विषयात दुर्दैवाने राजकारण आणले जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. कारखाना चालू राहिला पाहिजे, तरच शेतकऱ्यांचे हित जपले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भगवानराव जाधव, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंत झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती अजय कदम, नाना भिलारे, तानाजीराव मदने व डॉ. गणेश होळ उपस्थित होते.

चौकट :

‘त्यांच्या’ मागे नेमके सभासद किती?

जरंडेश्वर कारखाना आज मोठ्या क्षमतेने सुरू आहे, त्यामुळे सर्वचे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत होत असून, त्यांना जास्तीचा दर मिळत आहे. कारखान्याचा विषय निष्कारण आणून आमदार महेश शिंदे यांनी राजकारण करणे योग्य नाही, आपल्या मागे कारखान्याचे नेमके किती सभासद आहेत, हे त्यांनी एकदा अजमावून पाहावे, असे आव्हान संजय झंवर यांनी दिले.

चौकट :

राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळणार !

निसट्या मतांनी पराभव झाला म्हणून आमदार शशिकांत शिंदे हे थांबले नाहीत, त्यांनी खुल्या मनाने पराभव स्वीकारून जनतेमध्ये रममाणदेखील झाले, या उलट विद्यमान आमदार हे वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मतदारसंघात मोठी ताकद असून, गेल्या दोन वर्षांतील निवडणुकांमध्ये पक्षाने यश मिळविले आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्येदेखील राष्ट्रवादीच यश मिळवेल, असा विश्वास शिवाजीराव महाडिक यांनी व्यक्त केला.

Web Title: Shiv Sena MLAs crack down on CM's views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.