शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:11+5:302021-05-04T04:18:11+5:30

सातारा : ‘सातारा तालुक्यातील करंडी येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. संकटकाळात लोकोपयोगी ...

Shiv Sena office bearers cherished social commitment | शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Next

सातारा : ‘सातारा तालुक्यातील करंडी येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. संकटकाळात लोकोपयोगी काम करणाऱ्या मोहिते यांच्यासह सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे गौरवोद‌‌्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.

करंडी येथे कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गावातील प्रल्हाद जाधव यांनी स्वतःची तीन हजार स्क्वेअर फूट बांधकामाची इमारत कोणत्याही मोबदल्याविना कोरोना केअर सेंटरसाठी देऊ केली. शिवाय नारायण निकम यांनीदेखील मुंबई रहिवासी मंडळाकडून कोरोना प्रतिबंधासाठी निधी संकलित करण्यात मोलाचे योगदान दिले. कोरोनासारख्या भीषण संकटातही शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अमूल्य अशी कामगिरी करत आहेत. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे यावेळी बानुगडे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संयोजक निमिष शहा, तालुकाप्रमुख अनिल गुजर, सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे, महिला शहर संघटिका रूपाली लेंभे, मंजिरी सावंत, मीनल शहा, तालुका संघटक अमर मोहिते, तानाजी चव्हाण, प्रशांत शेळके, सुमित नाईक, अक्षय जमदाडे, रमेश बेडेकर, सुनील मोहिते, विकास जाधव आदी उपस्थित होते. सचिन मोहिते व अनिल गुजर यांनी सर्वांचे आभार मानले.

फोटो मेल : सातारा तालुक्यातील करंजी येथील कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: Shiv Sena office bearers cherished social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.