शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

By admin | Published: December 9, 2015 11:37 PM2015-12-09T23:37:12+5:302015-12-10T01:02:49+5:30

वासुदेव माने : रहिमतपूर पालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुनील माने यांच्यावर हल्लाबोल

Shiv Sena's fasting during Sharad Pawar's extension | शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

Next

रहिमतपूर : ‘पाणी मीटर मधील भ्रष्टाचार लपविणेसाठी सभांमधून कोणाच्याही वैयक्तिक कुटुंबाची वाभाडे काढणार असाल तर मला खालच्या पायरीवर उतरायला लावू नका,’ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवारीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिमतपूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी शेडगे, अ‍ॅड. अमर माने, अ‍ॅड. वैभव माने, किरण भोसले, अमर मदने, बाळासाहेब बर्गे, शंकर माने, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माने म्हणाले, ‘पाणी मीटरमधील भ्रष्टाचार जोपर्यंत उघडं होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेने उचलेले प्रत्येक पाऊल बहुजन हिताय व बहुजन सुखाय या न्यायाने करणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही हे लक्षात घेऊन वागावे.
शहरातील सर्व कामे सुयोग्य स्थितीत करावीत. नेहमी जवळच्या ठेकेदाराला टेंडर देऊ नये. अन्यथा त्याला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.’अ‍ॅड. अमर माने म्हणाले की, ‘शहरामध्ये भ्रष्टाचारी पाणी मीटर पद्धती घालवायची असेल तर लोकांनी घरपट्टी व पाणी पट्टी भरू नये. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नागरिकांचे आर्थिक शोषण जे चालू आहे ते थांबवावे. भ्रष्टाचाराला सुद्धा काही मर्यादा असतात. त्या ओलांडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.सतीश आडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित
भोसले यांनी आभार मानले. यावेळी ा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)

मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करत असून पाणी मीटर भ्रष्टाचारासंबंधी वासुदेव माने यांनी आरोप व उपोषण करण्यापेक्षा त्यांचे सरकार व पालकमंत्री असल्याने चौकशी लावावी. तसेच मीटर काढण्याची आॅर्डर त्यांच्या सरकारकडून त्यांनी घ्यावी. कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही.
-सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

उच्च न्यायालयात दावा दाखल करणार
शहराचा दुसरा प्रारुप विकास आराखडा सर्व समाज घटकांना घेवून करणे गरजेचे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हुकुमशाही राबवुन हा आराखडा केला आहे. त्यामुळे रहिमतपूरकरांचे स्वास्थ बिघडले असून त्या धक्याने एकाचा बळी सुद्धा गेला आहे. रहिमतपूरमध्ये जी काही नियमबाह्य व विकास आराखड्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. वैभव माने यांनी सभेत सांगितले.

Web Title: Shiv Sena's fasting during Sharad Pawar's extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.