अजिंक्यताऱ्यावर झाडांच्या कुंपणासाठी शिवकालीन विटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:34+5:302021-02-16T04:39:34+5:30
परळी : किल्ले अजिंक्यताऱ्यावर गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या संस्था दुर्ग संवर्धनासाठी अहोरात्र काम करीत आहेत. गडाला गतवैभव प्राप्त करून ...
परळी : किल्ले अजिंक्यताऱ्यावर गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या संस्था दुर्ग संवर्धनासाठी अहोरात्र काम करीत आहेत. गडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हे मावळे जिवाचे रान करत आहेत. काही वर्षांपूर्वी गडावरील सात तळी, धान्याचे कोठार, सबर, बुरुज, मंगळाईदेवीचे मंदिर अशा अनेक वस्तू भग्न होत चालल्या होत्या. त्या सर्वांचे रूपडे आता पालटलेले असून, अजिंक्यताऱ्यावर अनेक चांगल्या संवर्धनाची कामे होऊ लागली आहेत. नुकतीच नगरपालिकेची सभाही उत्साहात पार पडली.
हे सर्व असताना गडावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या संरक्षणासाठी ज्या विटा लावण्यात आलेल्या आहेत, त्या विटा गडावरील वाडे (वास्तू) यांच्या गोळा करून लावण्यात आल्या आहेत, ही बाब अत्यंत चुकीची आहे. गडावरील पुरातन वास्तूंचे संवर्धन करणे सोडून या वास्तूंचे अवशेष असे वापरणे चुकीचे आहे, असे मत इतिहासप्रेमींमधून होत आहे.
(कोट)
गडावरील वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे. या वास्तूंच्या उभारणीसाठी सर्व संघटनांनी एकदिलाने काम केले पाहिजे. गडावर जिथे वृक्षलागवड करणार आहात, त्या वृक्षांच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या वापरा; मात्र गडावरील वास्तूंचे अवशेष असे वापरणे म्हणजे या किल्ल्यांचा अवमान करण्यासारखेच आहे आणि असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.
- अक्षय शिंदे, छत्रपती सेवक सातारा
फोटो..
१५अजिंक्यतारा
अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षांच्या संरक्षणासाठी गडावरील वाडे (वास्तू) यांच्या विटा गोळा करून लावण्यात आल्या आहेत.