जंगली जयगडावर प्रथमच शिवजन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:33+5:302021-02-22T04:29:33+5:30

या गडावर प्रथमच होणा-या या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी वनरक्षक अतुल खोत, सचिन पाटील, वनकर्मचारी विनायक कदम, शिवप्रेमी दयानंद नलावडे, रफिक ...

Shiva Janmotsav for the first time on Jangali Jayagada | जंगली जयगडावर प्रथमच शिवजन्मोत्सव

जंगली जयगडावर प्रथमच शिवजन्मोत्सव

Next

या गडावर प्रथमच होणा-या या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी वनरक्षक अतुल खोत, सचिन पाटील, वनकर्मचारी विनायक कदम, शिवप्रेमी दयानंद नलावडे, रफिक सय्यद, गोरखनाथ सुपुगडे, किरण येडगे, अमर गायकवाड, संकेत मोहिते, रोहित पोतदार, विनायक काळे, प्रीतम सपकाळ, आशुतोष कदम, यश मोहिते हे उपस्थित होते.

कोयना नदी म्हणजे सुजलाम्, सुफलाम् महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी. महाबळेश्वरास उगम पावून क-हाडजवळ कृष्णेत समर्पित होणा-या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाकजवळ कोयना धरण उभारले गेले, तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. या कोयनानगरजवळील रामघळ व भैरवगड तसे डोंगरयात्रींना परिचयाचे; पण समुद्रसपाटीपासून एक हजार २९ मीटर म्हणजेच ३ हजार १६४ फूट उंचीवर उभा असणारा जंगली जयगड मात्र फारसा माहीत नाही. याच जंगली जयगडावर शिवजयंतीनिमित्त मंदिरासह आसपासच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर, गडपूजन व ध्वजपूजन करण्यात आले.

विधिवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी वनरक्षक अतुल खोत यांनी उपस्थितांना जंगली जयगडाचा इतिहास सांगितला. जंगलरक्षण, पर्यावरण संरक्षण याविषयी माहिती सांगितली. शिवप्रेमी दयानंद नलवडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज व वनसंपदा याविषयी माहिती दिली.

फोटो : २१केआरडी०५

कॅप्शन : पाटण तालुक्यातील जंगली जयगडावर यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वन्यजीव, वनविभागाचे अधिकारी तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Shiva Janmotsav for the first time on Jangali Jayagada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.