रहिमतपूर परिसरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:37+5:302021-02-20T05:50:37+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरसह परिसरातील गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरसह परिसरातील गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ आदी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी युवकांच्या उत्साहाला उधाण आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध गडांवरून ज्योत आणण्यासाठी पहाटेपासूनच युवक दुचाकीवर स्वार झाले होते. एकापाठोपाठ एक अशा दुचाक्यांच्या रांगा व त्यावर लावलेले भगवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. साप येथील शिवसंघर्ष युवा मंचने औंध येथून शिवज्योत आणली. सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मंचचे अध्यक्ष प्रतुल जाधव, उपाध्यक्ष आदित्य जाधव, आशिष जाधव, कौस्तुभ जाधव, साईराज जाधव, प्रसाद कुलकर्णी आदींनी पुष्पहार घालून अभिवादन केले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचच्यावतीने उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले.
चौकट..
बासुंदी चहाचे मोफत वाटप
शिवजयंतीनिमित्त रहिमतपूर येथील सागर जाधव चहावाले यांच्याकडून पाचशे कप बासुंदी चहाचे मोफत वाटप करण्यात आले. विविध गड व किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन ये-जा करणाऱ्या शिव मावळ्यांनी याचा लाभ घेतला. गेल्या तीन वर्षांपासून सागर चहावाले शिवजयंतीदिवशी मोफत चहा वाटप करतात.
19रहिमतपूर
फोटो : साप (ता. कोरेगाव) येथील शिवसंघर्ष युवा मंचच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. (छाया : जयदीप जाधव)