शिवाजी कुंभार ‘नॅनो’चे मानकरी

By admin | Published: November 21, 2014 11:44 PM2014-11-21T23:44:09+5:302014-11-22T00:09:02+5:30

‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हल : मान्यवरांच्या हस्ते काढलेल्या सोडतीत अनेकांचे उजळले भाग्य

Shivaji Kumbhar 'Nano' honorary | शिवाजी कुंभार ‘नॅनो’चे मानकरी

शिवाजी कुंभार ‘नॅनो’चे मानकरी

Next

सातारा : ‘लोकमत’च्या दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या दुसऱ्या लकी ड्रॉची आणि बंपर बक्षिसाची सोडत शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली. बंपर बक्षीस म्हणून हेम ग्रुप आॅफ कंपनीजतर्फे देण्यात येणाऱ्या ‘टाटा नॅनो’ मोटारीचा मान शिवाजी कुंभार यांना मिळाला.
दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या लकी ड्रॉमधील बंपर बक्षीस हेम ग्रुप आॅफ कंपनीजचे विपुल शहा यांच्या हस्ते काढण्यात आले. शिवाजी कुंभार यांच्या नावाची घोषणा होताच सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. ड्रॉमधील प्रथम प्रथम क्रमांकाचे ओम एन्टरप्रायजेसतर्फे दिले जाणारे बक्षीस बत्तीस इंची एलईडी टीव्ही असून, ते बालाजी मोबाइलचे संतोष शेडगे यांनी काढले. फिनिक्स एजन्सीकडून दिले जाणारे दुसरे बक्षिस वॉटर प्युरिफायर असून, ते हॉटेल राधिकाचे राजनशेठ शहा यांनी काढले. फिनिक्स एजन्सीकडून दिले जाणारे तिसरे बक्षीस आटाचक्की असून, ते ‘एस. कच्छी’चे शाकीर शेख यांनी काढले. नंदिनी इलेक्ट्रॉनिक्सकडून दिले जाणारे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस फ्रिज असून, ते सोनी कस्टम अँड वॉचेसचे रियाज शेख यांनी काढले. याखेरीज मान्यवरांच्या हस्ते शंभर उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात आली.
सोडतीवेळी हेम ग्रुपचे समीर मुल्ला, ‘कोमल इन्फोटेक’चे हेमंत देशमुख, ‘बालाजी मोबाइल’चे संतोष शेडगे, कौस्तुभ सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
(उत्तेजनार्थ शंभर पारितोषिक विजेत्यांची नावे उद्याच्या अंकात)


असे आहेत भाग्यवंत विजेते
कूपन नंबर नाव बक्षीस
००४९७२शिवाजी कुंभार टाटा नॅनो
००४३६४सुरेश गुरव एलईडी टीव्ही
००६१७६स्वरा काशीळकरवॉटर प्युरीफायर
००४३००कांचन पवार आटा चक्की
००४८७३पी. बी. रेड्डी फ्रीज



‘लोकमत दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या बक्षीस सोडतीवेळी डावीकडून संतोष शेडगे, राजनशेठ शहा, विपुल शहा, समीर मुल्ला, हेमंत देशमुख, शाकीर कच्छी, रियाज शेख, कौस्तुभ सातपुते.


भाग्यवंत विजेत्यांना बक्षिसांचे वितरण शनिवार, दि. २९ रोजी दुपारी चार वाजता समारंभपूर्वक होणार आहे. ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांसाठी या दिवशी शाहू कला मंदिरात ‘मानवंदना’ कार्यक्रम होणार असून, त्याच वेळी बक्षीस वितरण केले जाईल.

Web Title: Shivaji Kumbhar 'Nano' honorary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.