शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:45 PM2018-02-18T23:45:07+5:302018-02-18T23:45:19+5:30

Shivamari is the district with Shahagari ... | शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

Next


सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदींच्या जयघोषामुळे सर्वत्र शिवमय वातावरण आहे.
साताºयाबरोबरच जिल्ह्यात सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. साताºयात दि. १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तसेच सातारा शहरातील विविध तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सातारा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले. तर मुख्य चौक आणि बाजारपेठेत भगव्या पताका लावण्यात आल्या. अनेक मंडळांनी रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि कोरेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठेत पंचधातूचे कडे व राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले टीशर्ट खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली होती.
सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरून मशाली पेटवून नेण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. तसेच शहरातील मंडळे इतर जिल्ह्यांतील किल्ल्यांवरून ज्योत आणण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले आहे.

Web Title: Shivamari is the district with Shahagari ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.