...तर शिवेंद्रराजेंनी भाजपात जावे; समर्थकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:14 AM2019-03-06T05:14:14+5:302019-03-06T05:14:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असेल, तर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये जावे, अशी भूमिका नगरविकास आघाडीच्या (नविआ) सदस्यांनी घेतली आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असेल, तर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये जावे, अशी भूमिका नगरविकास आघाडीच्या (नविआ) सदस्यांनी घेतली आहे.
नगरविकास आघाडीच्या नगरसेवक, माजी नगरसेवक, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य यांची गोपनीय बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीला तीव्र विरोध करण्यात आला.
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत उदयनराजे यांचे नविआच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, परंतु निवडून आल्यावर उदयनराजे आणि त्यांचा कंपू विरोधात राहिला. नगरपालिका निवडणूक विरोधात लढली. नविआच्या उमेदवारांना पराभूत केल्यानंतर पालिकेत ‘रॉयल एन्ट्री’ केली. मग आता कशाला त्यांना नगर विकास आघाडीच्या मदतीची गरज पडली आहे? अशा भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या.