सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

By दीपक देशमुख | Published: November 25, 2024 12:54 PM2024-11-25T12:54:52+5:302024-11-25T12:56:14+5:30

दीपक देशमुख सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. ...

Shivendrasinharaje Bhosale, Jayakumar Gore, Shindesena Shambhuraj Desai confirmed for ministerial posts Curious about who the Guardian Minister is of Satara district | सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

दीपक देशमुख

सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्चांकी मताधिक्य मिळून मंत्रिपदावर दावेदारी सिद्ध केली आहे. शिवाय जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांचीही वर्णी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार आणि सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे येणार, याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडून आलेले आठही आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री कोण, हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपाचे चार आमदार निवडून आले आहेत.

शिवाय मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. यावेळी जिल्ह्यातून कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, दक्षिणमधून अतुल भोसले हे भाजपाचे तर फलटणमधून राष्ट्रवादीचे सचिन पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून जात आहेत.
 
तथापि, मंत्रिपदासाठी भाजपातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेतून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शंभूराज देसाई यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. सातारा जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी अजित पवार यांच्याकडून मकरंद पाटील पाटील यांचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाल दिवे येण्याची शक्यता पाहता पालकमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे.

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे सर्वात सीनियर

सातारा मतदारसंघातील शिवेंद्रसिंहराजे भोसले २००४ पासून सलग निवडून येत असून, ही त्यांची पाचवी टर्म आहे. स्वच्छ चेहरा, बेरजेचे राजकारण, राज्यातील उच्चांकी मताधिक्य, उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची अनुकूलता, यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी जयकुमार गोरेंचे प्रयत्न

जयकुमार गोरे हेही चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी जिल्ह्यात आपल्या मतदारसंघाबाहेर पडून जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. फलटणमध्ये रामराजे, कोरेगावात शशिकांत शिंदे, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांनाही त्यांनी प्रसंगी अंगावर घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्यामुळे उमेदवारांना ताकद मिळेल. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

Web Title: Shivendrasinharaje Bhosale, Jayakumar Gore, Shindesena Shambhuraj Desai confirmed for ministerial posts Curious about who the Guardian Minister is of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.