शिवकालीन राजमार्ग पूर्ववत सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:22+5:302021-07-15T04:27:22+5:30

बामणोली : कोयना भाग-४३ गावातील लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला शिवकालीन राजमार्ग कास पठार ते माचूतर महाबळेश्वर हा रस्ता ...

Shivkalin highway should be restored | शिवकालीन राजमार्ग पूर्ववत सुरू करावा

शिवकालीन राजमार्ग पूर्ववत सुरू करावा

Next

बामणोली : कोयना भाग-४३ गावातील लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला शिवकालीन राजमार्ग कास पठार ते माचूतर महाबळेश्वर हा रस्ता पूर्ववत सुरू राहावा, यासाठी सह्याद्री कोयना संघर्ष समिती ४३ गावे यांच्या वतीने सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व सातारा जावली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, कास पुष्प पठारावरून गेलेला शिवकालीन राजमार्ग हा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा रस्ता असल्याने तो जसा पूर्वी वाहतुकीसाठी व लोकांना येण्याजाण्यासाठी खुला होता, तसाच तो राहावा, जेणेकरून डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावातील लोकांना तो ये-जा करण्यासाठी सोयीस्कर होईल व पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्त्वाचा असणार आहे. या रस्त्यालगत असणा-या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण हे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करून कास बामणोली भागात गावागावांत रस्त्यांचे जाळे विणले आहे. ज्या ठिकाणी रस्ते तयार करणे किंवा डांबरीकरण करणे शक्य नव्हते, अशा सर्व रस्त्यांचे काम शिवेंद्रसिंहराजे यांनी मार्गी लावले आहे.

कास पुष्प पठारावरून गेलेला कास ते सह्याद्रीनगर हा रस्ता पूर्वीसारखा खुला करून सह्याद्रीनगर ते गाळदेव या रस्त्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डांबरीकरण केले आहे. त्यापुढे वनविभागाच्या हद्दीत अंदाजे २०० ते २५० मीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीमुळे डांबरीकरण होण्यासाठी राहिला आहे, त्याचे डांबरीकरण तत्काळ करण्यात यावे. हे तीनही प्रश्न खा. श्रीनिवास पाटील व आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अंधारी-कास उपसरपंच रवींद्र शेलार, बामणोली माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, के.के. शेलार, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू किर्दत, दत्ता किर्दत, तानाजी शेलार, फळणी सरपंच संतोष साळुंखे, निलेश भोसले, संतोष भोसले, दत्ता शिंदे, लक्ष्मण शिंदे, तुकाराम शिंदे सह्याद्रीनगर, बाळा जाधव, विष्णू जाधव, गणपत ढेबे, म्हाते मुरा, मंगेश गोरे यासह कास बामणोली भागातील कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

खडीकरणाचे काम आधी करा...

शिवकालीन राजमार्ग खुला करण्याबरोबर कास पठारावरून बामणोलीला जाणारा रस्ता कास धरणाची उंची वाढल्याने वाढीव पाणीसाठ्यामुळे तो बाधित होणार आहे. तरी, हा रस्ता कास ग्रामस्थांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातून कच्चा रस्ता तयार केला आहे. त्याचे खडीकरण व डांबरीकरण कास धरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी करून सदर रस्ता वाहतुकीसाठी धरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी सुरू करावा.

फोटो

फोटो ओळ : सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सह्याद्री कोयना संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

फोटो नेम : १४सुरुची

Web Title: Shivkalin highway should be restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.