शिवराज पाटील याचे कराटेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:43 AM2021-08-21T04:43:58+5:302021-08-21T04:43:58+5:30
उंडाळे : जम्मू-काश्मीर येथे दि. ६ ते ८ ऑगस्ट रोजी युथ अँड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या राष्ट्रीय कराटे ...
उंडाळे : जम्मू-काश्मीर येथे दि. ६ ते ८ ऑगस्ट रोजी युथ अँड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उंडाळे येथील रयत जीमखान्याचा खेळाडू शिवराज पाटील याने सबज्युनियर गटात दोन सुवर्णपदके पटकावली.
आजअखेर शिवराजने त्याच्या मेहनतीच्या जोरावर तब्बल ३० पदके पटकावली आहेत. लहानपणापासूनच खेळाची आवड असणाऱ्या शिवराजने कमी वयात पदकांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून त्याचे कौतुक केले जात आहे. त्याला ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील, दादा उंडाळकर समितीचे अध्यक्ष प. ता. थोरात, सदस्य विजयसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील व रयत जीमखान्याचे प्रशिक्षक प्रमोद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.