भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

By admin | Published: May 11, 2017 11:03 PM2017-05-11T23:03:56+5:302017-05-11T23:03:56+5:30

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

Shivsena's agitation against BJP .. | भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. बेताल वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल. बळीराजाची चालवलेली मस्करी कदापिही खपवून घेणार नाही. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कऱ्हाड येथे दत्त चौकात गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख विनायक भोसले, शहरप्रमुख शशिराज करपे, किरण नलवडे, मयूर देशपांडे, महेश पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
हर्षद कदम म्हणाले, ‘एकीकडे शेतकरी चहूबाजूंनी संकटात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज असताना जबाबदार व्यक्तींकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरीही रडगाणं चालूच आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या या वक्तव्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कऱ्हाड येथे गुरुवारी दत्त चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.’
भाजपविरोधात जिल्ह्यातील पहिले आंदोलन
सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आक्रमकता आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक आंदोलनातून पाहायला मिळाली आहे. मात्र, सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपचा शिवसेना हा मित्रपक्ष म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत शिवसेनेने सातारा जिल्ह्यात भाजपच्या विरोधात केलेले हे पहिलेच आंदोलन म्हणून याचा विशेष उल्लेख करावा लागेल. भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात भाजप सेनेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
रखरखत्या उन्हात घोषणा
रखरखत्या उन्हात शिवसैनिक एकत्र आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांनी परिसर दुमदुमून सोडला आणि दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने वातावरण अधिकच तापले.

Web Title: Shivsena's agitation against BJP ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.