साताऱ्याजवळ शिवशाही बस उलटली, 15 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:19 AM2018-07-25T10:19:51+5:302018-07-25T10:20:23+5:30

पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Shivshahi bus collapsed near Satara, 15 passengers injured | साताऱ्याजवळ शिवशाही बस उलटली, 15 प्रवासी जखमी

साताऱ्याजवळ शिवशाही बस उलटली, 15 प्रवासी जखमी

googlenewsNext

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

पुण्याहून चिपळूणच्या दिशेने शिवशाही बस (एम.एच०९ इ.एम,१९४) निघाली होती. पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव वाडी हद्दीत चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. यात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी मदतीला धावून येत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर स्थानिकांनीही जखमींना मदत केली. 

Web Title: Shivshahi bus collapsed near Satara, 15 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.