सिव्हिलमध्ये ‘शॉक ट्रिटमेंट’.. तंबाखू खाताच शंभरची पावती

By admin | Published: July 16, 2017 12:18 AM2017-07-16T00:18:14+5:302017-07-16T00:18:14+5:30

व्यसनमुक्तीसाठी प्रशासन आक्रमक : नातेवाइकांसोबत रुग्णही आढळले नियम मोडताना; आजपर्यंत चाळीसपेक्षाही जास्त नागरिकांवर दंडाची कारवाई

'Shock Treatment' in the Civil. Tobacco Account One hundred receipts | सिव्हिलमध्ये ‘शॉक ट्रिटमेंट’.. तंबाखू खाताच शंभरची पावती

सिव्हिलमध्ये ‘शॉक ट्रिटमेंट’.. तंबाखू खाताच शंभरची पावती

Next

दत्ता यादव ।  qलोकमत न्यूज नेटवर्क सातारा : व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीही केली जाते; परंतु म्हणावा तेवढा परिणाम होतोच असे नाही. यावर पर्याय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय व परिसरात तंबाखू खाताना आढळल्यास ‘शॉक ट्रिटमेंट’ देत शंभर रुपयांची पावती हातात देण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे व्यसनमुक्तीचा हेतू यशस्वीतेचे एक पाऊल पुढे टाकत आहे.
दरवर्षी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये तंबाखू न खाण्याबाबत प्रबोधन केले जाते. मात्र, नुसतीच जनजागृती करून लोकांमध्ये फारसा बदल होत नसल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय अखेर रुग्णालय प्रशासनाने घेतला.
जिल्हा रुग्णालय आवारात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला माने, डॉ. अशोक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक स्थापन करण्यात आले असून, या पथकामध्ये डॉ. योगिता शहा, डॉ. इला ओतारी, डॉ. दीपाली इंगवले, सूरज कवारे यांचा समावेश आहे.
हे पथक सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालय आणि आवारात फिरत असते. रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक तंबाखू खाताना आढळल्यास त्यांचे सुरुवातीला समुपदेशन केले जात आहे. त्यानंतर दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली असून, यापैकी दंड आकारला जात आहे. संबंधिताला रितसर पावतीही दिली जात असून, तंबाखू खाण्यापासून होणारे दुष्परिणाम संबंधित रुग्ण व अथवा त्यांच्या नातेवाइकांना समजावून सांगितले जात आहेत. काही दिवसांपासून हे पथक सिव्हिलमध्ये कार्यरत झाले आहे. आत्तापर्यंत या पथकाने ४० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यांना या पथकाबद्दल माहिती आहे, अशा लोकांनी या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे. दिवसाप्रमाणेच रात्रीही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
$$्रिॅगुड न्यूज

Web Title: 'Shock Treatment' in the Civil. Tobacco Account One hundred receipts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.