कोरोनाच्या त्रिशतकाने भरली धडकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:23+5:302021-03-18T04:39:23+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा ...

Shocked by Corona's three hundred! | कोरोनाच्या त्रिशतकाने भरली धडकी!

कोरोनाच्या त्रिशतकाने भरली धडकी!

Next

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र कोरोनाची संख्या चार पटीने वाढत आहे. दोन महिन्यांतील हा उच्चांकी आकडा आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. गतवर्षी २२ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याला आता पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात एकदाही कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली नाही. उलट वाढतच गेली. आता तर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे. प्रशासनाने एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविला असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळतेय. चालूवर्षीची ही ३०८ ची रुग्णसंख्या उच्चांकी आहे. ही आकडेवारी पाहून कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत. केवळ एका आठवड्यात एक हजारांहून अधिक रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ६१ हजार ३३५ वर पोहोचली आहे, गत चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये मार्डी (ता. माण) येथील ७३ वर्षीय पुरुष, भोसलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील ७५ वर्षीय महिला तसेच घोगाव (ता. कऱ्हाड) येथील ७५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. यामुळे बळींचा आकडा १ हजार ८७७ इतका झाला आहे.

चाैकट : सातारा अन् फलटण तालुका हाॅटस्पाॅट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा आणि फलटण तालुका कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरत असून, सातारा ४९ तर फलटणमध्ये ८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गतवर्षी सर्वांत आघाडीवर असलेला कऱ्हाड तालुका मागे असून, या तालुक्यात गत चोवीस तासांत १९ रुग्ण आढळून आले आहेत.

चाैकट : लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. दिवसाला आठ ते दहा हजार जणांना लस दिली जात आहे. आतापर्यंत १ लाख २०३ जणांनी लस घेतली आहे. हा आकडा आणखी वाढविण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Shocked by Corona's three hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.