धक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:18 PM2019-05-18T19:18:29+5:302019-05-18T19:20:53+5:30

नात्याला काळीमा फासणारी घटना वाई तालुक्यातील एका गावात घडली असून, मुलानेच आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Shocking: The boy did the same mother torture | धक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचार

धक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचार

Next
ठळक मुद्देधक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचारवाई तालुक्यातील खळबळजनक घटना

वेळे : नात्याला काळीमा फासणारी घटना वाई तालुक्यातील एका गावात घडली असून, मुलानेच आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावात पीडित महिला व तिचा पती आणि २८ वर्षाचा मुलगा वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पन्नास वर्षीय असलेली पीडित महिला (आई) ही गावातील लग्न असलेल्या एका नवरदेवाच्या घरातून जेवण करून घरी आली. त्यावेळी तिचा मुलगा घराच्या शेजारील कट्ट्यावर बसलेला होता.

आई घरात गेलेली पाहून तो आईच्या पाठोपाठ घरात गेला. त्याने आईचा गळा दाबून जबरदस्तीने आईवर अत्याचार केला. आईने आरडाओरड करून मला सोडवा.. मला सोडवा, अशी याचना केली. आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारील इतर महिला घराजवळ आल्या. त्यांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दार न उघडल्याने त्यांनी अखेर गावात जेवण करण्यास बसलेल्या पीडित महिलेचे पतीला बोलावून आणले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मुलाच्या तावडीतून सुटका करून पत्नीला त्यांनी घराबाहेर आणले. चिडलेल्या मुलाने वडिलांना दगडाने व लाथा बुक्याने जबर मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे आईला आणि वडिलांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने भुर्इंज पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली. या प्रकरणाचा गतिमान तपास व्हावा, यासाठी महिला फौजदार अमृता राजपूत यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

त्याला फासावर लटकवा...

आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्यां मुलाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. वाई तालुक्यात काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच मुलाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच वाई तालुक्यामध्येच मुलाने जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांमुळे वाई तालुक्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: Shocking: The boy did the same mother torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.