शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:14 PM2017-12-24T23:14:39+5:302017-12-24T23:16:01+5:30

Shocking from the century-old Krishna bridge | शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

googlenewsNext


वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.
राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ केला आहे़ यामध्ये नगरपालिकांनीही मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ तिमासिक, सांस्कृतिक महत्त्व असणारी कृष्णा नदी वाईची अस्मिता म्हणून ओळखली जाते. नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़, या जाणिवेतून वाई येथील कृष्णा सेवा कार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक,
नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी
‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम गेली तीन महिन्यंपासून हाती
घेतला होता. त्याचे फलित म्हणून
वाईचा कृष्णा घाट स्वच्छ व सुंदर झाला.
स्वयंसेवकांनी घाट परिसरातील कचारा, झुडपे व प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी काढून घाटावरील सर्व गटारे स्वच्छ केल्याने पाण्याचे मूळ प्रवाह मोकळे झाले आहेत. या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढ असून, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे.
कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली होती़ यामुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता़ यासाठी कृष्णा सेवाकार्य समितीच्या काशिनाथ शेलार, दीपक ओसवाल, डॉ़ नितीन कदम, नगरसेवक चरण गायकवाड, राहुल कचरे यांनी पुढाकार घेऊन सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पूल स्वच्छ व सुंदर करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांनी
सहकार्य करावे
कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोहोचू नये म्हणून कृष्णा सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पुलाची स्वच्छता केली आहे़ नागरिकांनीही पुलावरून निर्माल्याच्या पिशव्या व इतर काही टाकू नये, स्वच्छता राखण्यासाठी सर्वांचे अनमोल सहकार्य गरजचे आहे़ तरी या अभियानात सर्व वाईकरांनी सहकार्य करावे, असे अवाहन स्वच्छतादूत दीपक ओसवाल व काशिनाथ शेलार यांनी केले आहे़

Web Title: Shocking from the century-old Krishna bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.