Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Published: January 5, 2023 05:39 PM2023-01-05T17:39:29+5:302023-01-05T17:57:19+5:30

बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये एका महिलेचा मृतदेह पुरण्यात आला होता.

Shocking information has come to light regarding the body found in the bungalow of former BJP MLA in Satara, a case has been registered against one | Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सातारा : भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या महिलेचा खून करून मृतदेह पुरण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती आठवडाभरानंतर उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगल शिवाजी शिंदे (वय ५०, रा. संगम माहुली, ता. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगल शिंदे या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके हे या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. मंगल शिंदे यांचा खून करून त्यांचा मृतदेह माजी आमदार कांता नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील आवारात वाॅल कंपाऊंडच्या आतमध्ये पुरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

पुरलेला मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मंगल शिंदे यांचा मृतदेह पुरला असल्याचे तपासात समोर आले. हा खून कोणी केला, याची पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर आरोपीही निष्पन्न झाला. त्याने हा खून मंगल शिंदे यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी केला असल्याचे समोर आले.

शिंदे यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याचे डोरले आरोपीने काढून घेतले. यानंतर खोरे डोक्यात मारून त्यांचा खून केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. आरोपीला पकडल्यानंतरच यातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking information has come to light regarding the body found in the bungalow of former BJP MLA in Satara, a case has been registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.