मानेगावनजीक पुलावरील वळणावर भरतेय धडकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:16+5:302021-01-09T04:32:16+5:30
कऱ्हाड-ढेबेवाडी हा रस्ता नेहमी प्रवाशी, वडापच्या वाहनांनी गजबजलेला असतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने धोकादायक वळणे आहेत. अशात ...
कऱ्हाड-ढेबेवाडी हा रस्ता नेहमी प्रवाशी, वडापच्या वाहनांनी गजबजलेला असतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने धोकादायक वळणे आहेत. अशात कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे हायवेवरून ज्याप्रमाणे वाहने चालविली जातात, त्याप्रमाणे या मार्गावरून वाहनचालक वाहन चालवू लागला आहे. अनेक वळणांनी असलेल्या या कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर मानेगाव पुलालगतचे वळण हे जास्त अपघाती आहे. या वळणावर अनेकदा छोटे-मोठे अपघातही झालेले आहेत. त्यात अनेकजण जखमी, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाती वळणाबाबत फलक लावलेला असूनही या वळणावर वाहनांचा वेग काही केल्या कमी झालेला नाही. वाहने भरधाव वेगाने जाताना व वळणाचा अंदाज न आल्याने अनेकदा या वळणालगत घरांमध्येही वाहने घुसली आहेत. या वळणावर व अपुऱ्या संरक्षक कठड्यामुळे उभ्या असलेल्या पुलावरून वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.