पाच लाख उसनवार घेऊन दुकानदाराची फसवणूक

By admin | Published: February 13, 2015 12:14 AM2015-02-13T00:14:31+5:302015-02-13T00:47:16+5:30

‘आमचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत करतो,’ असे सांगिल्यामुळे दबडे यांनी सुरुवातीला तीन लाखांचा धनादेश मालन खोचे यांच्या नावावर दिला.

Shopkeeper fraud by taking five lakh taka | पाच लाख उसनवार घेऊन दुकानदाराची फसवणूक

पाच लाख उसनवार घेऊन दुकानदाराची फसवणूक

Next

सातारा : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उसनवार म्हणून घेतलीली पाच लाखांची रक्कम परत केली नाही. या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.महेश रमेश रसाळ (रा. नागपूर), मालन भास्कर खोचे ऊर्फ मालन उमेश कुदळे, उमेश नारायण कुदळे, युवराज नारायण कुदळे, धनराज नारायण कुदळे, जयराज नारायण कुदळे (सर्व रा. केसरकर पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.संतोष शिवाजी दबडे (वय ३८, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांचे मंगळवार पेठेमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाशेजारी महेश रसाळ याचे दुकान आहे. त्यामुळे दोघांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. महेश रसाळ याने सासरे उमेश कुदळे, पत्नी मालन कुदळे यांची दबडे यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर कुदळे यांचे दबडे यांच्या दुकानात येणे-जाणे सुरू झाले. उमेश कुदळे यांची मुले युवराज व धनराज यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी दबडे यांच्याकडे पाच लाख उसने पैसे मागितले. मात्र, एवढे पैसे नसल्याचे सांगूनही कुदळे यांनी दबडे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. ‘आमचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत करतो,’ असे सांगिल्यामुळे दबडे यांनी सुरुवातीला तीन लाखांचा धनादेश मालन खोचे यांच्या नावावर दिला. त्यांनी तो धनादेश स्टेट बँकेमध्ये जमा केला. काही दिवसांनंतर पुन्हा दबडे यांच्याकडे कुदळे यांनी पैसे मागितले. तुम्ही आणखी दोन लाख दिले तर नवीन व्यवसाय सुरू करता येईल, अन्यथा तुम्ही दिलेले पैसेही मुदतीत तुम्हाला परत करता येणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे दबडे यांनी पुन्हा दोन लाखांचा धनादेश दिला. असे एकूण पाच लाख रुपये कुदळे यांना उसने देण्यात आले.
सहा महिन्यांनंतर दबडे यांनी त्यांना पैसे मागितले असता, कुदळे यांनी ‘खासगी सावकारी केल्याची पोलिसांकडे तक्रार करेन,’ अशी त्यांना धमकी दिली. त्यामुळे दबडे यांनी या सर्वांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची पोलिसांनी प्राथमिक सत्यता पडताळल्यानंतर कुदळे कुटुंबावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार पवार अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shopkeeper fraud by taking five lakh taka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.