मोफत धान्यासाठी ‘ई-पॉस’वर दुकानदाराचा अंगठा; वाढणारा कोरोनाचा धोका टळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:56+5:302021-05-05T05:02:56+5:30
सातारा : जिल्ह्यामध्ये शासनाने जाहीर केल्यानुसार गरीब व गरजूंना मोफत तांदूळ, गहू वाटप होणार आहे. हे वाटप होत असताना ...
सातारा : जिल्ह्यामध्ये शासनाने जाहीर केल्यानुसार गरीब व गरजूंना मोफत तांदूळ, गहू वाटप होणार आहे. हे वाटप होत असताना पॉस मशीनच्या माध्यमातून फरक नाही पडला. कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने संबंधित दुकानदाराचा अंगठा पात्र धरून वितरण करण्याचे नियोजन केले असल्याने कोरोनाचा धोका टळणार आहे.
एक मे पासून जवळपास सर्वच जिल्ह्यात मोफत स्वस्त धान्य मिळणार आहे. मात्र, त्यासाठी रेशनधारकाला ई-पॉस मशीनवर अंगठा लावणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका आहे. सध्याचा संसर्गाचा दर पाहता रेशीम दुकानांमधून याचा संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आधीच तयारी केलेली आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांच्या बाहेर एक मीटरच्या अंतरावर चौकोनी बॉक्स तयार केलेले आहेत. रेशनिंग घ्यायला येणारे ग्राहक तोंडाला मास्क लावून आले तरच त्यांना रेशन दुकानांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
रेशनिंग दुकानांवर गर्दी होऊ नये याची खबरदारीदेखील दुकानदारांनी घेतली आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये रेशनिंग दुकानदारांनी काय ठरावीक आळी, गल्ल्यानुसार लोकांना बोलावून घेऊन वितरण सुरू केलेले आहे.
१) एकूण रेशनकार्डधारक -
अंत्योदय योजना- २८२२०२
प्राधान्य कुटुंब क्रम यादी -३८२१६४
२) रेशन दुकानावर सॅनिटायझर राहणार (बॉक्स)
रेशनिंग दुकानमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने केलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार यांनी व्यवस्था केलेली आहे. पाॅस मशीनवर ग्राहकाचा थेट आणता येणार नसल्याने संसर्गाचा धोका कमी आहे.
कोट
प्रशासनाने केलेल्या सूचनांनुसार दुकानाच्या बाहेर १ मीटर अंतरावर चौकोनी बॉक्स तयार केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी म्हणून विशेष काळजी घेतलेली आहे.
- बबलू साळुंखे
कोट
शासनाच्या वतीने देण्यात येणारे मोफत धान्य लाभार्थ्यांना मिळणार आहे. धान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी आम्ही तयारी केली आहे ग्राहकांनी गर्दी केली नाही तर योग्य पद्धतीने व सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून वितरण योग्य पद्धतीने होईल.
- संजय राजपूत
५) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट
जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत. पॉस मशीनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीदेखील खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- स्नेहा किसवे देवकाते
जिल्हा पुरवठा अधिकारी
फोटो : सातारा तालुक्यातील रेशन दुकानावर सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून धान्याचे वितरण केले जात आहे. (छाया : सागर गुजर)