ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:16+5:302021-07-02T04:26:16+5:30
कातरखटाव : खटाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा झाल्यामुळे कातरखटाव प्राथमिक आरोग्य लस केंद्राबाहेर गर्दी व गोंधळ उडाल्याचे दिसत ...
कातरखटाव : खटाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा झाल्यामुळे कातरखटाव प्राथमिक आरोग्य लस केंद्राबाहेर गर्दी व गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. सकाळपासून वादावादीचे प्रसंग घडू लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
गेली आठ दिवस खटाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील केंद्रामध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आरोग्य केंद्रात काही प्रमाणात लस आल्याचे समजताच कातरखटावसह पळसगाव, डाळमोडी, बोबाळे, डांभेवाडी, बनपुरी, येलमरवाडी, येरळवाडी, हिंगणे, तडवळे, खातवळ, मानेवाडी, तुपेवाडी, बारा वाड्या-वस्त्यातील नागरिक, युवावर्ग लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र लसीचे डोस कधी ऐंशी, तर कधी सत्तर उपलब्ध होत असल्याने दोनशे लोकांना कशी पुरणार, असा प्रश्न निर्माण होत असून, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संकट कायम आहे. शासनाने लसीकरण मोहिमेला जोर दिला असून, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. १६०० लसीकरण उद्दिष्टापैकी ४५ वयोगटांतील १२७७ नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला जात असून ७९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
अशा तऱ्हेने नागरिक सकाळपासून रांगेत राहूनही मुबलक लसीचा होत नसल्याने सर्वांना वेळेत लस मिळणे कठीण होत चालले आहे. शासनाने सुरू केलेल्या लसीकरण डोस घेतल्यानंतर नागरिकांना असे वाटत आहे की, आपल्यापासून कोरोना कायमचा गायब झाला, असे वाटत आहे. अशा तऱ्हेने लसीकरण केंद्राबाहेर सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडत असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कोट -
शासनाने लस घेण्याचे आवाहन केले असले तरी गेल्या दहा दिवसांपासून लस मिळत नाही. पहिली लस घेऊन ९० दिवस झाले. त्यामुळे आम्ही हेलपाटे मारत आहे.
-लक्ष्मण सावंत, ज्येष्ठ नागरिक, पळसगाव
०१कातरखटाव
फोटो ओळ - लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ झाल्याने केंद्राबाहेर गर्दी दिसून येत आहे. (छाया : विठ्ठल नलवडे)