श्वानांवरही आपुलकी, प्रेम प्रकट करावे : देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:30+5:302021-03-19T04:37:30+5:30
वाई : ‘श्वान पालकांनी आपल्या श्वानांवरचे प्रेम प्रकट करावे,’ असे उद्गार श्वानआरोग्य तज्ज्ञ डॉ. सुनील देशपांडे यांनी श्वानप्रेमींसमोर काढले. ...
वाई : ‘श्वान पालकांनी आपल्या श्वानांवरचे प्रेम प्रकट करावे,’ असे उद्गार श्वानआरोग्य तज्ज्ञ डॉ. सुनील देशपांडे यांनी श्वानप्रेमींसमोर काढले.
वाई येथे ‘आंतरराष्ट्रीय लव युवर पेट डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सुनील देशपांडे म्हणाले, ‘श्वान पालन हे एक आनंदाचे, जबाबदारीचे काम आहे. ज्याप्रमाणे अनेक डेज साजरे करतो त्याचप्रमाणे हा दिवस असला तरी त्याच्यात थोडासा वेगळेपणा आहे. येथे प्रेम प्राण्यांच्या बाबतीत प्रकट करायचे आहे. आपणही त्यांच्यावर प्रेम करतोच पण ते प्रकट करणं आवश्यक आहे.’
या दिवशी उपस्थित श्वानपालकांनी सेल्फी पॉइंटवर लाडक्या श्वानाबरोबर सेल्फी काढली. प्रत्येक श्वानाला टाय, शोभेच्या छोट्या वस्तू आणि खास खाऊ देऊन त्यांचे लाड करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील पन्नासहून अधिक श्वानप्रेमींनी श्वानांसह हजेरी लावली. कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. रोहित निंबाळकर आणि विक्रांत घोरपडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. (वा. प्र.)
फोटो
१८वाई-डॉग
वाई येथे आंतरराष्ट्रीय लव युवर पेट डे निमित्त आयोजित कार्यक्रमात श्वानप्रेमी लाडक्या श्वानांसह आले होते. (छाया : पांडुरंग भिलारे)