सरकारचे घातले श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:08 PM2018-06-03T23:08:34+5:302018-06-03T23:08:34+5:30

 Shraadh is the government sponsored | सरकारचे घातले श्राद्ध

सरकारचे घातले श्राद्ध

Next


कºहाड : वर्षभरापूर्वी १ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतो, असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने आजतागायत ते पूर्ण केलेले नाही. अशा लबाड सरकारचा निषेध नोंदवित आहोत, असे सांगत रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील प्रीतिसंगमावरील कृष्णा-कोयना नदीकाठी सरकारचे श्राद्धच घातले.
कºहाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी कोयना व कृष्णा नदीकाठावर प्रीतिसंगामावर रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘१ जून २०१७ रोजी शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यभर संप केला होता. त्यावेळी सरकारने कर्जमाफी, शेतीपंपाची वीजबिल माफी, शेतकºयांना दरमहा पेन्शन योजना, शेतमाल व दुधाला हमीभाव आदी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज त्याची वर्षपूर्ती झाली; पण आश्वासने पूर्ण झाली नाहीत.
शेतकरी अन् कार्यकर्ते आक्रमक
आश्वासने देणाºया भाजप सरकाच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जेव्हा सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन केले. तेव्हा आंदोलनस्थळी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी, शेतकरी महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी आक्र मक पवित्रा घेत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच श्राद्ध घातले.

Web Title:  Shraadh is the government sponsored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.