बारामतीला भावलं श्रमदान- भांडवली : पुरंदरे, इंदापूरच्या ग्रामस्थांकडूनही जलसंधारणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:24 AM2018-06-13T00:24:36+5:302018-06-13T00:24:36+5:30

भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेदरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी भेट दिली.

Shramdan- Capital of Baramati - Bhawanary: Purandare, Indapur, water conservation survey | बारामतीला भावलं श्रमदान- भांडवली : पुरंदरे, इंदापूरच्या ग्रामस्थांकडूनही जलसंधारणाची पाहणी

बारामतीला भावलं श्रमदान- भांडवली : पुरंदरे, इंदापूरच्या ग्रामस्थांकडूनही जलसंधारणाची पाहणी

Next

म्हसवड : भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेदरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी भेट दिली. यावेळी इंदापूर, पुरंदर येथील दुष्काळी ३३ गावांतील दीडशे ग्रामस्थांना भांडवलीच्या शिवाराची सैर घडवत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कशी कामे करून दुष्काळावर मात करता येईल, याची पाहणी केली.

यावेळी माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, माणचे सभापती रमेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, म्हसवडच्या उपनगराध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी, अजित पवार, दादासाहेब चोपडे, रमेश शिंदे, प्रशांत वीरकर व मान्यवर उपस्थित होते.

भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कालावधीत उपसरपंच सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गावांनी एकजुटीच्या बळावर अतिशय शास्त्रशुद्ध, दर्जेदार व आखीव-रेखीव जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावातील जलसंधारणाची कामे दिखाऊपेक्षा टिकाऊ झाल्याची पाहून बारामती, इंदापूर व पुरंदर येथील ग्रामस्थांसह मंडळी आश्चर्यचकित झाली. जोरदार पाऊस पडूनसुद्धा चर, खोल सलग समतल चर, अनघड दगडी बांध, बांध-बंदिस्ती, माती नाला बांध यातील एकही संरचना फुटली नव्हती.

गावाची ओळख पाणीदार...
गांवची दुष्काळी ओळख पुसून आपले गाव पाणीदार होऊन गावची ओळख बागायती गाव होण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतलेले उपसरपंच सुनील सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी कविता सूर्यवंशी यांनी दिलेले योगदान अमूल्य असून, या पद्धतीने प्रत्येकाने काम केले तर गावागावामध्ये अमूलाग्र बदल होईल. अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
 

विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांत दोनदा अतिवृष्टी होऊनसुद्धा येथील जलसंधारणाची एकही रचना तुटली, फुटली नाही. यावरून लक्षात येते की काम किती शास्त्रशुद्ध झाले आहे. जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत; पण या पद्धतीचे उत्कृष्ट काम मी कुठेही पाहिले नाही.
- सुनंदा पवार, विश्वस्त, अ‍ॅग्रीकल्चरल ट्रस्ट बारामती.

करायचे म्हणून काम न करता मनापासून केलेले जलसंधारणाचे काम पाहायचे असेल तर एकवेळ भांडवलीला अवश्य भेट द्यावी.
- रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य पुणे

बारामती, इंदापूर व पुरंदरच्या ग्रामस्थांनी पाहणी करून केलेले कौतुक ही भांडवलीकरांच्या कामाची पोचपावती आहे.
- प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त.
 


 

Web Title: Shramdan- Capital of Baramati - Bhawanary: Purandare, Indapur, water conservation survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.