माणच्या मातीत महादेव जानकरांकडून श्रमदान

By admin | Published: April 15, 2017 09:11 PM2017-04-15T21:11:19+5:302017-04-15T21:11:19+5:30

महादेव जानकर यांनी शनिवारी वडगावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवारात पडणारा पाऊस शिवारात जिरवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी गावक-यांनी केले.

Shramdan from Mahadev Jankar | माणच्या मातीत महादेव जानकरांकडून श्रमदान

माणच्या मातीत महादेव जानकरांकडून श्रमदान

Next

 ऑनलाईन लोकमत

सातारा, दि. 15 -  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे. या मातीतून लहानाचे मोठे झालेले पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी वडगावला भेट दिली. यावेळी त्यांनी हातात कुदळ घेऊन काहीकाळ श्रमदानही केले.
 
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी रवींद्र्र सांगळे, सरपंच नीलम अवघडे, उपसरपंच नितीन ओंबासे, ग्रामसेवक सतीश भोसले, तलाठी दिलीप कोकरे, कृषी सहायक आर. बी. नरळे, अजित पवार, चंद्रकांत दडस, बाळासाहेब शिंदे, नितीन ओंबासे, साहेबराव ओंबासे, अजित जाधव, दादासाहेब ओंबासे, सोमनाथ दडस, सुभाष ढमाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री जानकर म्हणाले, ‘शिवारात पडणारा पाऊस शिवारातच अडवून तो शिवारात जिरवला पाहिजे. त्याशिवाय गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाहीत. उद्योगपतींशी चर्चा करून या भागात मोठा उद्योग आणून येथील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकºयांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक शेतकºयांनी शेततळी बांधून या तळ्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करावा. त्यासाठी मत्स्य बीज व मत्स्य खाद्य दिले जाईल.’ (प्रतिनिधी)
 

Web Title: Shramdan from Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.