शुभमंगल @ बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:04 PM2018-04-15T23:04:09+5:302018-04-15T23:04:09+5:30
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्यापासुन ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळे कार्यक्रम बनावट पद्धतीने उरकले जातायत.
कºहाड तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकापाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाले. लग्न लाऊन देण्याच्या नावाखाली काही जणांनी फसवणूक केल्याचे नवरदेवांचे म्हणणे आहे. संबंधितांनी पोलिसांना विवाहाची जी ‘स्टोरी’ सांगीतली, तीही एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आहे. बनावट लग्नाच्या या कथानकाला विवाह इच्छूक सावज शोधण्यापासुनच सुरूवात होते. ज्यांची लग्न रखडली आहेत, असे युवक शोधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीत कºहाड तालुक्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीजणांचा सहभाग आहे. ज्यांना विवाह करायचा आहे, असे युवक शोधून हे संशयीत त्यांना तात्काळ लग्न लाऊन देण्याचे अमिष दाखवतात. सांगली किंवा कोल्हापुरला नेऊन त्याठिकाणी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रमही पार पाडला जातो. पसंती झाल्यानंतर विवाह लाऊन देण्यासाठी लाखोत रक्कम सांगीतली जाते. तसेच मुलीची परिस्थिती नसल्याने तिला दागिने घालण्यासही सांगण्यात येते. एवढे दिवस रखडलेले लग्न होऊ घातल्याने इच्छूक वरही पैसे आणि दागिने देण्यास तयार होतात. वराकडून पैसे मिळाल्यानंतर त्याचठिकाणी अथवा आसपासच्या मंदिरात वधु-वराला हार घालण्याचा आणि अक्षदा टाकण्याचा कार्यक्रम घेतला जातो. हा बनावट विवाह पार पडताच वराकडून ही टोळी पैसे उकळते. त्यानंतर दोनच दिवसात फिरायला जाण्याचा बहाणा करीत नववधु आपल्या पतीला परगावी घेऊन जाते. आणि तेथुनच त्याची नजर चुकवून ती दागिन्यांसह पसार होते.
फसवणुकीत महिलांचाही सहभाग
कºहाड तालुका पोलीस ठाण्यात १५ जानेवारी २०१८ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात इचलकरंजी येथील एका महिलेचा समावेश आहे. तसेच त्यावेळीही इच्छूक वराला एक युवती दाखविण्यात आली होती. जी लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी पळून गेली. तर फसवणुकीची दुसरी फिर्याद २२ मार्च रोजी दाखल झाली. फिर्याद देणाºया संबंधित युवकालाही कोल्हापुरात आरती नावाच्या युवतीला भेटविण्यात आले होते. तसेच तिच्यासोबत त्याचा विवाहही लाऊन देण्यात आला होता.
लग्नासाठी इच्छुकाने जमिनही विकली
लग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याची तक्रार देणाºया एका इच्छूक वराने विवाहासाठी जमिन विकल्याचा प्रकारही पोलीस तपासातून समोर आला आहे. जमिन विकून मिळालेले पैसे त्याने विवाह ठरविणाºयांना दिले होते. तसेच त्याच पैशातून त्याने आपल्या होणाºया पत्नीला दागिनेही खरेदी केले होते. मात्र, पैसे घेऊन संबंधित व्यक्ती तसेच विवाहानंतर दागिने घेऊन संबंधित युवती पसार झाली आहे.