कुडाळ परिसरात शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:24+5:302021-05-28T04:28:24+5:30
कुडाळ : सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला ...
कुडाळ : सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा व प्रशासनाच्या समन्वयातून गेली दोन दिवसांपासून कुडाळ आणि परिसरात याची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने सगळीकडे शुकशुकाट पहायला मिळत होता.
एरवी या ना त्या कारणांनी कुडाळच्या बाजारपेठेत परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असायची; मात्र कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत सगळीकडे सन्नाटा दिसत होता. लोकांच्या हितासाठीच प्रशासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी याला योग्य प्रतिसाद देत घरी राहणेच पसंत केले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवावगळता संपूर्ण बाजारपेठेत शांतता दिसत होती.
(चौकट)
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, त्यांच्यावर कारवाई होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. नागरिकांचाही याकरिता चांगला प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावर वाहनांची तुरळक ये-जा दिसत होती. यामुळे फिरणाऱ्या चाकांची गतीही काहीशी मंदावलेली पहायला मिळाली.
===Photopath===
270521\img_20210527_144454.jpg
===Caption===
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने कुडाळच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता.