घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 02:02 PM2023-05-27T14:02:14+5:302023-05-27T14:19:29+5:30

पृथ्वीराज पाटील व प्रियांका पाटील या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे.

Siblings Prithviraj Prashant Patil and Priyanka Prashant Patil from Karad have been selected in the examination conducted by MPSC | घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका

घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका

googlenewsNext

अजय जाधव

उंब्रज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कराड तालुक्यातील शिरगाव येथील पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत पाटील या सख्ख्या भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी) म्हणून निवड झाली आहे.

पृथ्वीराज पाटील व प्रियांका पाटील या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे. पृथ्वीराज याने व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे. तर प्रियांका यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे.

स्पर्धा परीक्षेत अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असते. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे महत्वाचे असते. हे दोघांनी केले. भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडविणे आणि आपल्या चुका कोणत्या आहेत ते बघून झालेल्या चुका दुरुस्त केल्या. टाईम मॅनेजमेंट करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या.

सराव चाचणी दिल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांबाबत हे भाऊ बहिण चर्चा करायचे. त्यातून एकमेकांच्या चुका सुधारत राहिले. पृथ्वीराज याला पहिल्या प्रयत्नात एका मार्काने अपयश आले होते. परंतु हार न मानता दुसऱ्या परीक्षेची तयारी केलीच पण सोबत बहीण प्रियांका हिला ही घेतले. दोघांनी मिळून दोघांनी यश संपादन केले.

 १० तास अभ्यास करत होतो

पृथ्वीराज व प्रियांका सांगतात की, आम्ही दररोज कमीत कमीत १० तास अभ्यास करत होतो. रात्री वडिलांच्या सोबत शतपावली करायला जायचो त्यावेळी दिवसभर केलेल्या अभ्यासाची वडिलांसोबत चर्चा करायचो. आणि वडील आम्हाला मार्गदर्शन करायचे. वडील प्रशांत पाटील हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहेत. तर आई पूनम या गृहिणी आहेत. पाटील कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांनी दोन्ही मुलाचे शिक्षण हे शैक्षणिक कर्ज काढूनच केले. त्यांना इंजिनीयर बनवले. वडिलांचे व आईचे दोन्ही मुलांना शासकीय अधिकारी बनविण्याचे स्वप्न होते. त्यांची स्वप्नपूर्ती या भाऊ बहिणींने मिळून केली.

Web Title: Siblings Prithviraj Prashant Patil and Priyanka Prashant Patil from Karad have been selected in the examination conducted by MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.