सिद्धेवाडीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: September 15, 2015 12:45 AM2015-09-15T00:45:53+5:302015-09-15T00:45:53+5:30

विषप्राशन : दहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; वडील प्रगतशील शेतकरी

Siddhewadi debt-ridden farmer suicides | सिद्धेवाडीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सिद्धेवाडीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next

सावळज : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येतील तरुण शेतकरी प्रदीप दगडू चव्हाण (वय २७) यांनी सोमवारी चव्हाण वस्ती येथील घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
प्रदीप यांचे वडील दगडू चव्हाण परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची १३ एकर शेती असून, त्यापैकी नऊ एकरवर शेवगा व तीन एकरवर द्राक्षबाग आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. प्रदीप चव्हाण आई, वडील, पत्नी, भाऊ व वहिनी यांच्यासह राहत होते. वडिलांना शेतीत मदत करत होते. शेतीतील अडचणीमुळे उत्पन्न कमी मिळत होते. त्यातच कर्जाचा डोंगर वाढल्याने आर्थिक विवंचनेतून प्रदीप यांनी सोमवारी विषारी द्रव्य प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले. प्रदीप चव्हाण यांचे १० महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, लग्नाला वर्षही पूर्ण व्हायच्या आत घडलेल्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पंधरवड्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या
दि. ३ सप्टेंबर रोजी मणेराजुरी (ता. तासगाव) येथील किरण बाबासाहेब जमदाडे या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या घटनेला १५ दिवस झाले नाहीत तोच सिद्धेवाडीतील प्रदीप दगडू चव्हाण या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कर्जाचा ससेमिरा
२००३-२००४ च्या दुष्काळामध्ये दगडू चव्हाण यांची द्राक्षबाग पाण्याअभावी जळून गेली होती. त्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली. मात्र वातावरणामुळे त्यांना डाळिंबातून फारसे उत्पन्न न मिळाल्याने परत शेवगा व द्राक्षबाग लावली होती. दरम्यान शेतीसाठीचे कर्ज वाढतच गेले व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने प्रदीप यांनी आत्महत्या केली.
 

Web Title: Siddhewadi debt-ridden farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.