पादचारी मार्ग दुरवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:49+5:302021-05-31T04:27:49+5:30

ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ...

The sidewalk is in poor condition | पादचारी मार्ग दुरवस्थेत

पादचारी मार्ग दुरवस्थेत

Next

ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

धोकादायक वळण

कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. या वळणावरून भरधाव वाहनावरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत.

हायमास्टचा झगमगाट

मल्हारपेठ : कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील विहे बसथांब्याचा परिसर हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाला आहे. पन्नास मीटर उंचीचे टॉवर उभारून त्यावर हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात झगमगाट होत आहे. विहे बसथांबा हे परिसरातील महत्त्वाचे ठिकाण आहे. सध्या हायमास्ट दिवे बसविल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

दुचाकीधारक हैराण

कऱ्हाड : परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गत काही दिवसांत चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी घरासमोर तसेच शेतातील वस्तीवर लावलेल्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. वर्षभर कोराेनामुळे चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The sidewalk is in poor condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.