अजंठा चौक ते आहिरे कॉलनी रस्त्याची चाळण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:23+5:302021-02-23T04:58:23+5:30
करंजे : अजंठा चौक ते आहिरे कॉलनी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना ...
करंजे : अजंठा चौक ते आहिरे कॉलनी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
सातारा शहरातील एमआयडीसीमध्ये जाताना कंपनीतील कामगार, तसेच परिसरातील लोकांना दररोज वाहने चालवून कंबरडे घाईला आले आहेत. अजंठा चौकापासून खड्ड्यांची मालिका सुरू होते ती आहिरे कॉलनीच्या चौकापर्यंत वाहनधारकांना रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता असाचा भास होतो. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, जणू रस्त्यावर काही खोदकामच करून ठेवले आहे की काय? असा अनुभव येत आहे. या रस्त्यावरून दररोज चाकरमानी सातारा एमआयडीसीत कामासाठी जात असताना या रस्त्यामधील नक्की कोणता खड्डा चुकवावा हे कळत नाही. त्यामुळे रस्त्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागतेय.
अजंठा चौक ते आहिरे कॉलनी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने नेहमी वाहतूक कोंडीची होत असते. कामगारांना एक तर कामावर वेळेवर पोहोचायचे असते, अन् दुसरे म्हणजे कामावरून घरी जाताना घरी सुखरूप जायचे असते. बरीच वर्षे झाली तरी या रस्त्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. तरी संबंधित विभाग एखादा मोठा अपघात होण्याचीच वाट पाहत आहे की काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल. संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल.
(चौकट)
जागोजागी चार-चार फुटांचा खड्डा..
या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ जास्त आहे म्हणून रस्त्यावर जास्त खड्डे पडले आहेत, तर काही नागरिकांच्या मते ज्या-ज्या वेळी रस्त्याचे काम होते त्यावेळी निकृष्ट दर्जाचे केले जाते. पण, हा रस्ता बऱ्याच वर्षांपूर्वी तयार केला असावा. जागोजागी चार-चार फुटांचा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे वाहने घसरल्याने अपघातासारख्या घटनेत वाढ झाली आहे.
फोटो आहे...
२२करंजे