चाफळ विभागात रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:30+5:302021-01-04T04:32:30+5:30
चाफळ विभागातील रस्त्यांवर चार फुटांचे रुंंद व एक फूट खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे ...
चाफळ विभागातील रस्त्यांवर चार फुटांचे रुंंद व एक फूट खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने याकामी लक्ष घालून मोठ-मोठे खड्डे भरून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा, अशी मागणी या विभागातील ग्रामस्थांनी केली आहे. गत काही महिन्यांपासून चाफळ, पाडळोशी, केळोली, विरेवाडीकडे जाणाऱ्या पंधरा किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत रस्ता आहे की रस्त्यावर खड्डा, हेच ओळखणे कठीण झाले आहे. सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले असून, त्यातून चालणेही अवघड झाले आहे. चालकांना वाहन चालविणेही जिकिरीचे बनले आहे. तर दुसरीकडे एसटी या रस्त्यावर बंद पडल्यास किवा पंक्चर झाल्यास दिवसभर या भागात एसटी येत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.