साताऱ्यात उंटांची ‘सैराट’गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:06 PM2018-07-24T23:06:38+5:302018-07-24T23:06:42+5:30

The 'siratagiri' of camels in Satara | साताऱ्यात उंटांची ‘सैराट’गिरी

साताऱ्यात उंटांची ‘सैराट’गिरी

Next

स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याचे हिंदीसह अनेक भाषेत रिमेक निघाले. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही. साताºयातील एका तरुणाने चक्क आपल्याकडील सात उंटांना या चित्रपटातील कलाकरांची नावे दिली असून, उंटांची ही ‘सैराट’गिरी सातारकरांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत मराठी सिनेमासृष्टीत सर्वाधिक कमाई करण्याचा बहुमान पटकाविला. या चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल यांच्या गाण्यांनी तर तरुणांना झिंगाट केलं होतं. आजही अनेकांच्या मोबाईलच्या रिंगटोनवर सैराटचीच गाणी वाजत असतात. या चित्रपटात प्रमुुख भूमिका करणाºया परश्या व आर्ची या पात्रांचे डायलॉग अन् त्यांच्या अनोख्या प्रेमकथेने युवा पिढी भारावून गेली. या चित्रपटाला दोन वर्षे झाली तरी यातील पात्र, त्यांची नावे अन् डायलॉगची क्रेझ आजही पाहावयास मिळत आहे.
साताºयातील निहाल खरात या तरुणाकडे सात उंट आहेत. त्याला सैराटमधील कलाकारांनी इतकी भुरळ घातली की त्याने आपल्या सातही उंटांना परश्या, आर्ची, सल्या, लंगड्या, आनी, आकाश व प्रशांत अशी नावं दिली आहेत. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याला झिंगाट, सैराट झालंजी, आतागं बय्या ही गाणी खूप आवडतात. त्याच्या मोबाईलवरील हीच गाणी उंटांनाही ऐकण्याची सवय झाली आहे. उंटही नाचत असतात.
तीन उंटांना परश्याची नावे
परश्या हे पात्र आकाश ठोसरने स्वत:च्या सहजसुंदर अभिनयाने अगदी उत्तमपणे साकारले आहे. त्याने साकारलेल्या चॉकलेट हिरोची भूमिका आवडल्याने निहालचा आकाश सर्वात आवडता अभिनेता झाला आहे. त्यामुळे त्याने सातपैकी तीन उंटांना परश्या, प्रशांत आणि आकाश अशी नावे दिली आहेत.
उंटांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह...
निहाल खरात हा गेल्या अनेक वर्षांपासून उंटाचे संगोपन करत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून लोकांना उंटावर बसवणे, लग्न, तसेच मिरवणुकीत उंट भाड्याने देणे यातून मिळणाºया पैशांवर कुटुंबाची गुजराण करणे असा दिनक्रम निहालचा सतत सुरू असतो. या सात उंटांवर त्याच्या कुटुंबातील पंधरा सदस्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे उंटच त्यांच्या जगण्याचे मुख्य साधन आहेत.

Web Title: The 'siratagiri' of camels in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.