सायरनचा गळा दाबला अन् मोकाटाचा चेहरा खुलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:05+5:302021-05-25T04:44:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारी रोखण्यासाठी संचारबंदी लागू करूनदेखील शहरांतील अंतर्गत रस्ते तसेच चौक, गल्ली ...

Siren's throat was pressed and Anmokata's face opened! | सायरनचा गळा दाबला अन् मोकाटाचा चेहरा खुलला!

सायरनचा गळा दाबला अन् मोकाटाचा चेहरा खुलला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारी रोखण्यासाठी संचारबंदी लागू करूनदेखील शहरांतील अंतर्गत रस्ते तसेच चौक, गल्ली बोळांमध्ये लोक गर्दी करीत आहेत. शासनाचे नियम पायदळी तुडवून लोक मोकाट फिरतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध राहिले नाहीत. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात शहराबाहेर एक पेशंट सापडला तेव्हा पोलिसांची वाहने सायरन वाजवत शहरभर फिरायची. आता मात्र या वाहनांचा गळा दाबला गेल्याने लोक मोकाट झाले आहेत.

जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने १४४ कलम लागू केले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू असल्याने ज्या लोकांना प्रशासनाने सूट दिली आहे, त्या व्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर येऊ शकत नाही. आता किराणामाल, भाजी या गोष्टीदेखील मिळू शकणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या आदेशांची कठोर अंमलबजावणी झाली नाही तर हे आदेश केवळ कागदोपत्री ठरतील आणि मोकाट फिरणारे लोक कोरोनाचे प्रसाद वाटप करीत फिरतील.

सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील मोठे आहे. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनचा प्रयोग प्रशासनाने राबविला, तरीदेखील कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तपासण्या वाढल्या तसे रुग्णदेखील वाढलेले पाहायला मिळतात.

लोकांना दहशतच राहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या दुचाक्या पोलीस ठाण्यात उभ्या न ठेवता बाहेर काढल्या, शहरात त्यांची गस्त वाढली तरच खऱ्या अर्थाने लोक घरात बसून राहतील, अन्यथा संसर्ग रोखणे कठीण आहे.

पोलीस चौकात.. मोकाट यांचा गल्लीत थयथयाट..

शहरामध्ये सातारा शहर आणि शाहूपुरी ही दोन पोलीस ठाणी आहेत. पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. या पोलिसांना शहरातील काही पॉइंट्स ठरवून दिले आहेत, त्याठिकाणी पोलीस थांबतात; परंतु गल्लीबोळात मात्र मोकाट यांचा अक्षरशः थयथयाट सुरू आहे. संचारबंदी असताना देखील शहरामध्ये काही टपोरी गॅंग वाहने घेऊन रस्त्यावर उतरतात. अनेकांच्या दुचाकीवर अत्यावश्यक सेवा असे लिहिलेले देखील पाहायला मिळते. मिसरुड न फुटलेली पोरं कुठली अत्यावश्यक सेवा देत आहेत? याची खातरजमा देखील पोलिसांनी आता करायला हवी.

सायरनची वाहने बाहेर येऊ देत

पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जशा सायरनच्या गाड्या फिरायच्या, तशा गाड्या फिरल्या तर हे मोकाट सगळ्यात पहिल्यांदा घरात जाऊन बसतील. पोलीस दलामध्ये आता नवी वाहने दाखल झालेली आहेत, ही वाहने कशी आहेत? एकदा साताऱ्यातील जनतेला दिसतील. मंत्र्यांच्या मागे-पुढे सायरन वाजवत फिरणाऱ्या गाड्यांचे सायरन वाजताना सातारकर रोजच पाहतात. आता कोरोनाचा संसर्ग वाढविणाऱ्यांवर दहशत बसण्यासाठी आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी पोलिसांना सायरन वाजवत वाहने फिरवावी लागतील. पोलिसांनी पुन्हा आपल्याकडे असलेल्या दुचाक्या सायरन लावून बाहेर काढाव्यात.

लॉकडाऊन करण्याआधी जिल्ह्यातील रुग्ण

१४ एप्रिल रोजी

१०९०

कडक लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील रुग्ण २५ मे रोजी

२६४८

फोटो ओळ : सातारा शहरात सोमवारी वाहनधारकांनी अशी गर्दी केली होती. एकट्या पोलीसदादाला या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अगदी अवघड होऊन बसले होते. (छाया : जावेद खान)

Web Title: Siren's throat was pressed and Anmokata's face opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.