ओगलेवाडीत शंभर मिटरमध्ये सहा गतीरोधक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:07 PM2017-08-03T15:07:29+5:302017-08-03T15:09:35+5:30

ओगलेवाडी : कºहाड-विटा मार्गावर नुकतेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ओगलेवाडी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ शंभर मीटरच्या अंतरात तब्बल सहा गतीरोधक तयार करुन अक्षरश: अतिरेक केला आहे. नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमी झाली असली तरी गतीरोधकाच्या आकारामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Six resistant in ogre! | ओगलेवाडीत शंभर मिटरमध्ये सहा गतीरोधक!

ओगलेवाडीत शंभर मिटरमध्ये सहा गतीरोधक!

googlenewsNext
ठळक मुद्दे नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमीनियमांच्या पायमल्लीमुळे गंभीर अपघाताची शक्यता

 
ओगलेवाडी : कºहाड-विटा मार्गावर नुकतेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ओगलेवाडी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ शंभर मीटरच्या अंतरात तब्बल सहा गतीरोधक तयार करुन अक्षरश: अतिरेक केला आहे. नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतीरोधकामुळे वाहनांची गती कमी झाली असली तरी गतीरोधकाच्या आकारामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कºहाड-विटा मार्गावरील मोठे गाव म्हणून ओगलेवाडी-हजारमाचीची ओळख निर्माण झाली आहे. ही आजूबाजूच्या दहा ते बारा गावांची बाजारपेठ आहे. दोन-तीन महिन्यांपुर्वीच कºहाड-विटा मार्गावरील कृष्णा कॅनॉल ते करवडी फाटा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने हा रस्ता दररोज यावरुन जाणाºया हजारो वाहनांसाठी पुरेसा रूंद झाला आहे.


रस्त्याच्या मधोमध दुभाजकही बसवण्यात आले आहेत. या रस्त्याचा दर्जाही ठेकेदाराकडून समाधानकारक ठेवल्यामुळे वाहनधारकांच्याकडून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु ओगलेवाडी परिसरातील काही लोकांच्या दबावापुढे झुकून बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी गावात केवळ शंभर मीटर अंतरादरम्यान तब्बल सहा भले मोठे गतीरोधक तयार केले आहेत. त्यामुळे वाहनांची गती भलेही कमी झाली असेल मात्र गंभीर अपघाताची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे.
गुहागर-विजापूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला केंद्र सरकारकडून काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचाच भाग असणाºया कºहाड-ओगलेवाडी टप्प्यालाही सर्व नियम लागू होतात. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्यमार्गावर गतीरोधक तयारच करु नये, असा नियम असताना बांधकाम विभागाने नियमांची उघड पायमल्ली करीत ओगलेवाडीमध्ये गतीरोधकांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. सुरुवातीला याठिकाणी रम्बलर गतीरोधक बसवण्यात आले. परंतु भुरट्या चोरट्यांनी स्टील चोरण्यासाठी संबंधित रम्बलर फोडले. त्यामुळे डांबरी गतीरोधक तयार करण्यात आले. ते तयार करतानाही कोणतेही निकष पाळलेले नाहीत.
तब्बल एक फूट उंचीचे आणि तीन फूट रुंदीचे हे राक्षसी गतीरोधक म्हणजे सर्व लहानमोठ्या वाहनधारकांसाठी अक्षरश: कर्दनकाळ ठरत आहेत. त्यातच त्यावर काळे पांढरे पट्टेही मारण्यात आले नसल्यामुळे दूर अंतरावरुन त्यांचा अजिबात अंदाज येत नाही. परिणामी वाहनधारकांना अगदी समोर आल्यावरच त्यांची जाणीव होते आणि वाहन जोरदार आपटणे, स्लीप होणे, असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होत आहेच. परंतु गेल्या आठवड्यापासून अनेक दुचाकीधारक प्रामुख्याने या परिसरात असलेल्या एका बँकेसमोरील गतीरोधकाजवळ जखमी झाले आहेत.
हे गतीरोधक त्वरीत काढून टाकण्यात न आल्यास इथे एखादा गंभीर अपघात घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहणार आहेत.


ओगलेवाडी-हजारमाची परिसरात शेकडो इतर समस्या असताना येथील काही स्थानिक लोकप्रतिनिधी वाहनांची गती ही एकमेव समस्या असल्याप्रमाणे गतीरोधकाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलनाचा इशारा देत होते. या दबावाला बळी पडूनच बांधकाम विभागाने नियमबाह्य पद्धतीने गतीरोधक तयार केले असल्याची ग्रामस्थांच्यात चर्चा आहे.

Web Title: Six resistant in ogre!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.