सहावर्षीय अनंत जाधवने केले दोन किलोमीटरचे अंतर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:08 PM2019-12-03T17:08:30+5:302019-12-03T17:13:45+5:30
वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
संदीप कुंभार
मायणी : वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
ही मॅरेथॉन २१ किलोमीटर, ५ किलोमीटर व २ किलोमीटर धावणे अशी होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. मायणी येथील प्राथमिक शाळेतील पहिलीमधील विद्यार्थी अनंत जाधव याने या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. दोन किलोमीटर अंतर त्याने एवढ्या लहान वयात पूर्ण केले.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण जन्मत:च असतात; पण ते आपल्याला दिसत नसतात. या गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या यशाचे गमक कशात आहेत, हे पाहणे गरजेचे असते. मुले मैदानी खेळ कशी खेळतील? याकडे मायणी जिल्हा परिषद शाळेचे अधिक लक्ष असते.
शिवाय मुलाच्या अन्य आवडीच्या गोष्टींवरही प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या या पहिलीतील अनंत जाधवने मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर अंतर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत ते पूर्ण केले. त्याचे कौतुक करत आदी मुलांना प्रोत्साहन, प्रेरणा व सुप्त गुणांना वाव देणे सारखेच आहे, असे ललिता बाबर यांनी सांगितले.
मायणी जिल्हा परिषद शाळेकडून अनंत जाधवने वडूज येथील रनर्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित माणदेश मॅरेथॉनचे स्पर्धेमध्ये सहभागी घेतला. त्याने दोन किलोमीटर अंतर पूर्ण केल्याबद्दल त्याचा यथोचित सन्मान व सत्कार केला.
मायणी येथील फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष सयाजी जाधव व त्यांची दोन मुले आहेत. एक संस्कार दहा वर्षे व अनंत सहा वर्षांचा आहे. या पिता-पुत्रांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनुक्रमे पाच व दोन किलोमीटर अंतर पूर्ण केले.