दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाचा मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:25+5:302021-05-24T04:38:25+5:30

मलकापूर : कराड-ढेेबेवाडी मार्गावर चचेगावच्या हद्दीत दुचाकीच्या धडकेत सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. आईसोबत रस्ता ओलांडत असताना ...

A six-year-old boy was injured in a two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाचा मुलगा जखमी

दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाचा मुलगा जखमी

Next

मलकापूर : कराड-ढेेबेवाडी मार्गावर चचेगावच्या हद्दीत दुचाकीच्या धडकेत सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. आईसोबत रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. समर्थ संतोष शेळके (रा. चचेगाव, ता. कराड) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी समर्थची आई अर्चना शेळके (वय २८, रा. चचेगाव) यांनी कराड ग्रामीण पोलिसांत खबर दिली आहे. या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चचेगाव येथील गौरव किराणा दुकानासमोर आई अर्चना यांच्यासोबत समर्थ रस्ता ओलांडत होता. यावेळी ढेबेवाडीकडून आलेल्या दुचाकीची समर्थला धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वार शेखर संगाप्पा यलगुरी (रा. रैनाक वस्ती, आगाशिवनगर) याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: A six-year-old boy was injured in a two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.