ग्रामीण भागातील युवकांची ‘स्मार्ट फोन’साठी मोलमजुरी

By admin | Published: May 22, 2014 12:05 AM2014-05-22T00:05:24+5:302014-05-22T00:21:00+5:30

व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसाठी धडपड : काहीही करण्याची तयारी

'Smart Phone' for the youth in rural areas | ग्रामीण भागातील युवकांची ‘स्मार्ट फोन’साठी मोलमजुरी

ग्रामीण भागातील युवकांची ‘स्मार्ट फोन’साठी मोलमजुरी

Next

 विशाल गुजर, परळी : दिवसेंदिवस शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असताना ग्रामीण भागात इंटरनेट वापरणार्‍या युवकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. पालकांकडून काहीही कारणे सांगून किंवा इतर उलाढाली करून युवक अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी इंटरनेटचा निकाल आणि इतर माहिती मिळविण्यासाठी शहरात इंटरनेट कॅफेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सायबर कॅफेत तासन्तास चॅटिंग करणार्‍या युवक-युवतींही आता घरबसल्या मोबाईलवरती दहा रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतचे रिचार्ज मारून तो संपेपर्यंत चॅटिंग करण्यात मग्न आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसाठी चांगला मोबाईल असावा, असे प्रत्येक युवक-युवतीला वाटत असल्याने अगदी पालकांना काहीही कारणे सांगून तसेच युवक वर्ग गवड्यांच्या हाताखाली मोलमजुरी, हमाली, बिगारी काम, शेतकर्‍यांच्या शेतातील कामे करून कोणाकडूनही पैसे उसणे घेऊन, ओळखीच्या मोबाईल शॉपीमधून मित्राकडून हप्त्यावर मोबाईल खरेदी करत आहेत. नेटच्या साह्याने, व्हॉटस्अ‍ॅपच्या मदतीने कोणाचाही फोटो, कशाही पद्धतीने करून कोठेही पाठवत आहेत. दिवस असो वा रात्र फोटो चांगले येत असल्याने मोबाईलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ‘टूजी’ नंतर आता ‘थ्रीजी’ची क्रेझसुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ग्रामीण भागात, खोर्‍यात, दर्‍यात ज्या कोणत्या कार्डच्या कंपनीला जास्त रेंज व नेटस्पीड आहे, त्याची मागणीही वाढत आहे. ग्रामीण वातावरणही हायटेक झाल्याचे चित्र आहे.

Web Title: 'Smart Phone' for the youth in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.